इम्रान खान यांनी दिलं अरविंद केजरीवालांचे उदाहरण; म्हणले, भारतातील सर्वोच्च न्यायालयाने....

पाकिस्तानातील नॅशनल अकाउंटेबिलेटी कायद्यातील (एनएओ)सुधारणांबाबत इम्रान यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्या दरम्यान, इम्रान यांनी केजरीवालांच्या जामिनाचा संदर्भ दिला.
 Ex-Pakistan PM Imran Khan cites Arvind Kejriwal Case before Pakistan Supreme Court
Ex-Pakistan PM Imran Khan cites Arvind Kejriwal Case before Pakistan Supreme Court
Updated on

इस्लामाबाद, ता. ७ (पीटीआय) ः पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्यादरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दाखला दिला आहे. ‘‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भारतातील सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन दिला होता. मात्र, मला निवडणुकीच्या आधी तुरुंगात टाकण्यात आले,’’ असे खान यांनी गुरुवारी सुनावणी दरम्यान न्यायालयाला सांगितले.

पाकिस्तानातील नॅशनल अकाउंटेबिलेटी कायद्यातील (एनएओ)सुधारणांबाबत इम्रान यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्या दरम्यान, इम्रान यांनी केजरीवालांच्या जामिनाचा संदर्भ दिला. भारतातील न्याय व्यवस्थेने केजरीवालांना निवडणूक प्रचारासाठी जामीन दिला तर पाकिस्तानात या वर्षी आठ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेव्हा मला निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी तुरुंगात टाकण्यात आले, देशात अघोषित मार्शल लॉ लागू करण्यात आला होता असे खान म्हणाले. पाकिस्तानचे सरन्यायाधीश काझी फैज ईसा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी सुरू आहे.

 Ex-Pakistan PM Imran Khan cites Arvind Kejriwal Case before Pakistan Supreme Court
Arvind Kejriwal : केजरीवाल म्हणतात, सहा किलो वजन घटलं; ईडीकडून मात्र वजन वाढल्याचा दावा, कोर्टाकडून निकाल राखीव

प्रक्षेपण न केल्याबद्दल नाराजी


‘एनएओ’बाबत खटल्याच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे अशी मागणी करणारी खैबर पख्तुन्ख्वा सरकारची याचिका न्यायालयाने फेटाळल्याबद्दल इम्रान खान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मी या खटल्याच्या सुनावणीच्यामाध्यमातून राजकीय लाभ मिळवत असल्याचे प्रतिपादन न्यायालयाने मागील सुनावणी दरम्यान केले आहे, मी असा कोणता राजकीय लाभ घेतला आहे, असे न्यायालयाने सांगावे असे खान म्हणाले.

 Ex-Pakistan PM Imran Khan cites Arvind Kejriwal Case before Pakistan Supreme Court
PM Modi Claim Power: मोदींनी राष्ट्रपतींकडं केला सत्ता स्थापनेचा दावा; शपथविधीसाठी दिलं निमंत्रण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()