Firecracker Factory Blast: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; २३ कामगारांचा होरपळून मृत्यू, अनेक जण जखमी

Thailand Firecracker Factory Blast: थायलंडमधील सुफान बुरी येथे फटाक्यांच्या कारखान्यात काल (बुधवारी १७ जानेवारी) दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला.
Firecracker Factory Blast
Firecracker Factory BlastEsakal
Updated on

थायलंडमधील सुफान बुरी येथे फटाक्यांच्या कारखान्यात काल (बुधवारी १७ जानेवारी) दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये २३ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. तर काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

स्काय न्यूजच्या दिलेल्या माहितीनुसार, या भीषण स्फोटात सुमारे 23 लोकांचा मृत्यू झाला आहे. थायलंडच्या मध्यवर्ती सुफान बुरी प्रांतातील स्थानिक बचाव कर्मचार्‍यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये स्फोटाची जागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.

तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाकडून मृतदेह शोधण्यासाठी लष्कराची मदत घेतली जात आहे. सध्या बचावपथकाकडून युद्धपातळीवर मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बँकॉकपासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुफान प्रांतात घडली. हा किनारी भाग असून येथे फटाक्यांचे अनेक कारखाने आहेत. यातील बहुतांश कारखाने जुने आहेत.

Firecracker Factory Blast
Eknath Shinde in Davos: दावोसमध्ये 4 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार; CM शिंदेंनी सांगितलं कारण

या भागात दाट लोकवस्ती असल्याने आजूबाजूच्या भागातील लोक या कारखान्यांमध्ये काम करतात. बुधवारी दुपारच्या सुमारास या कारखान्यात अनेक मजूर काम करीत होते. त्याचवेळी कारखान्यात अचानक स्फोट होऊन आगीचा भडका उडाला.

स्फोट झाल्यानंतर क्षणार्धात परिसरात धुराचे मोठ-मोठे लोळ पसरले होते. या घटनेत आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

Firecracker Factory Blast
Pakistan-Iran: इराणसोबतचे संबंध चिघळले! पाकिस्तानने घेतला मोठा निर्णय; चीन करतोय मध्यस्थीचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.