Pakistan News : निवडणूका चार दिवसांवर...पाकिस्तानात निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेरच स्फोट

पाकिस्तानची सार्वत्रिक निवडणूक चार दिवसांवर आलेली असताना देशात विविध भागात हल्ले आणि स्फोट घडत आहेत.
Pakistan News : निवडणूका चार दिवसांवर...पाकिस्तानात निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेरच स्फोट
Updated on

कराची, ता. ३ (पीटीआय): पाकिस्तानची सार्वत्रिक निवडणूक चार दिवसांवर आलेली असताना देशात विविध भागात हल्ले आणि स्फोट घडत आहेत. निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला असला तरी निवडणूक प्रक्रियेत अडथळे आणले जात आहेत.

ग्रेनेड हल्ल्यांची घटना ताजीच असताना शुक्रवारी रात्री शहरातील पाकिस्तान निवडणुक आयोगाच्या (इपीसी) कार्यालयाबाहेर स्फोट झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रांतीय कार्यालयाच्या वाहनतळात आयईडी स्फोटकाने भरलेली बॅग कचराकुंडीत फेकल्यानंतर स्फोट झाला. मात्र या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही.

वरिष्ठ पोलिस अधिकारी सय्यद असद रजा म्हणाले, आयईडी स्फोटकाने भरलेली बॅग पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या प्रांतीय मुख्यालयाच्या वाहनतळात ठेवली होती. बॅगमध्ये टायमरसह एक आयईडी ठेवण्यात आला होता. त्याची वेळ रात्री ९ ते दहा अशी ठेवली होती. मात्र वाहनतळात साफसफाई करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने ती बॅग पाहिली आणि त्यास इमारतीबाहेरच्या कचराकुंडीत फेकली. बॅग फेकताच लहान स्फोट झाला आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

Pakistan News : निवडणूका चार दिवसांवर...पाकिस्तानात निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेरच स्फोट
Ganpat Gaikwad Firing Video : आधी गोळ्या झाडल्या अन् मग... पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर

हल्लेखोरांचे लक्ष्य निवडणूक आयोगाचे कार्यालय होते. हा बॉम्ब वाहनतळात फुटला असता तर मोठे नुकसान झाले असते, असे पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, निवडणूक जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये सातत्याने बॉम्बस्फोट आणि ग्रेनेड हल्ले होत आहेत. अन्य एका घटनेत न्यू कराची भागात प्रचारादरम्यान दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला.

खैबर पख्तुनख्वाव्यतिरिक्त कराची, क्वेट्टा, सिंध, बलुचिस्तान प्रांताच्या अन्य भागात निवडणुकीसंबंधी हिंसाचाराच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने नुकतीच आपत्कालीन बैठक बोलावली होती. त्यानंतर निवडणुकीच्या काळात बंदोबस्तात वाढ करण्याचे ठरविले.

Pakistan News : निवडणूका चार दिवसांवर...पाकिस्तानात निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेरच स्फोट
FASTag KYC Deadline : फास्टॅग वापरकर्त्यांना मोठा दिलासा! सरकारने वाढवली KYCची मुदत; झटपट 'असे' करा अपडेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.