युक्रेन - रशियामध्ये आणखी वाद चिघळताना दिसत आहे. युक्रेनच्या सीमेवरून सैन्य माघारी घेत असल्याची घोषणा रशियाने केली होती मात्र त्यानंतरही यांच्यातील वाद कमी झाला नाही. यातच शुक्रवारी पूर्व युक्रेन (Ukraine) मधील डोनेट्स्क शहरातील एका वाहनात मोठा स्फोट झाला. त्याशिवाय पूर्व युक्रेनमध्ये गॅस पाइपलाइनच्या एका भागाला आग लागल्याचीही घटना समोर आली होती. यावरून खरचं रशियाने सैन्य माघारी घेतले का, असा उपस्थित केला जातोय
अलीकडच्या काही दिवसांत या प्रदेशात युक्रेनियन सैन्य आणि रशिया-समर्थित बंडखोर यांच्यातील हिंसाचाराच्या वाढीच्या घटना वाढत आहे. यातुनच हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे इथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी पूर्व युक्रेनमधील डोनेट्स्क शहरातील एका कारमध्ये मोठा स्फोट झाला ज्या कारमध्ये हा स्फोट झाला, ती कार ही एका विभागीय सुरक्षा अधिकारी डेनिस सिनेंकोव यांची होती. या शहरात रशियाचा पाठिंबा असलेल्या फुटीरतावाद्यांचे वास्तव्य आहे.
रशिया (Russia) समर्थक फुटीरतावाद्यांनी यासाठी युक्रेनला जबाबदार धरले. काल देखील युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. यामध्ये एका शाळेचे मोठे नुकसान झाले होते.मात्र या स्फोटाने तणाव अधिकच वाढला असुन परीसरात दहशतीचे वातावरण आहे.सध्या युक्रेन आणि रशिया हे दोन्ही देश एकमेकांवर आरोप करत आहेत.
याआधी अमेरिकेने (America) रशियाला इशारा दिला होता. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी रशिया युक्रेनवर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो असे म्हटले होते. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस (kamala Harris) आणि परराष्ट्रमंत्री यांना म्युनिचमध्ये होत असलेल्या परिषदेत सहभागी होण्यास सांगितले होते यातून जगभरातील नेत्यांना रशियाविरुद्ध एकत्र आणले जाऊ शकेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.