अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. 2020 साली निवडणूक निकाल बदलण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. आता याप्रकरणी जॉर्जियातील एका न्यायाधीशांनी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे.
जॉर्जियातील फुल्टन काउंटी जिल्हा वकील फॅनी विलिस यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी ट्रम्प यांच्या 18 साथीदारांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं. यासाठी त्यांना डेडलाईन देण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ग्रँड ज्युरी यांनी 13 गंभीर आरोप केले होते. या आरोपांमध्ये RICO, खोटी कागदपत्रं दाखल करणे, सार्वजनिक अधिकारी म्हणून घेतलेल्या शपथेचं उल्लंघन करणं आणि इतर आरोपांचा समावेश आहे.
"ट्रम्प यांच्यासह इतर सहकाऱ्यांवर असे आरोप आहेत, की त्यांनी ट्रम्प यांचा पराभव मान्य केला नव्हता. यामुळे जाणून बुजून, बेकायदेशीरपणे निकालांचे पराभव ट्रम्प यांच्या बाजूने बदलण्याच्या कटामध्ये हे सर्व सहभागी झाले होते", असं फॅनी यांनी आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे.
त्या पुढे म्हणाल्या, "20 जानेवारी 2021 पासूनच डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष करण्याची योजना सुरू करण्यात आली होती. यासाठी जॉर्जिया आणि इतर ठिकाणी मतांची मोजणी रोखण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले होते."
ट्रम्प यांच्यासह या आरोपांमध्ये व्हाईट हाऊसचे माजी चीफ ऑफ स्टाफ मार्क मिडोज, न्यूयॉर्कचे माजी मेयर रुडी गिउलियानी आणि ट्रम्प सरकारमधील न्याय विभागाचे अधिकारी जेफरी क्लार्क यांचा समावेश आहे.
या सर्वांना आत्मसमर्पण करण्यासाठी पुढील शुक्रवारपर्यंत वेळ देण्यात आली आहे. 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत या सर्वांना दिली गेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.