नवी दिल्ली- गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी आपल्या पहिल्या अमेरिकेच्या प्रवासासंबंधी एक आठवण सांगितली आहे. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात मला शिकता यावे, यासाठी वडिलांनी एक वर्षाची कमाई खर्च केली होती, असं पिचाई म्हणाले आहेत. सोमवारी 2020 वर्षीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आभासी पदवीप्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना एक संदेश दिला आहे. 'बुद्धी उघडी ठेवा, अधीर व्हा, आशावादी रहा', असं ते म्हणाले आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या विद्यार्थ्यांना पदवी समारंभ कार्यक्रमाला मुकावे लागले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आभासी पद्धतीने सन्मानित केले जात आहे. यावेळी पिचाई यांनी आपल्या घरुन या कार्यक्रमात भाग घेतला. तसेच या कार्यक्रमात अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा, माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा, सिंगर लेडी गागा यांचाही सहभाग होता.
----------
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कोरोना
----------
दिल्लीत पुन्हा संघर्ष; नायब राज्यपालांचा केजरीवालांना दणका
----------
केंद्र सरकारचा नवा उपक्रम; आता घरोघरी होणार तपासणी
----------
कितीही कठीण काळ येऊ द्या, पण तुम्ही नेहमी सकारात्मक राहा, असं पिचाई म्हणाले होते. अमेरिकेत शिकायला येणे त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात येऊन शिक्षण घेणं त्यांच्यासाठी किती आव्हानात्मक होतं हे पिचाई यांनी यावेळी सांगितलं. अमेरिकेला जाणाऱ्या विमानाचे तिकीट खरेदी करण्यासाठी माझ्या वडिलांना एक वर्षाची कमाई खर्च करावी लागली होती. तेव्हा कुठे मी स्ट्रॅनफोर्ड विद्यापीठात येऊन शिकू शकलो. हा माझा पहिलाच विमानप्रवास होता आणि अमेरिकेला येणे खूप खर्चिक होतं. घरी एक फोन कॉल करण्यासाठी एका मिनिटासाठी 2 डॉलर द्यावे लागायचे. तसेच एका बॅगची किंमत माझ्या वडिलांच्या एका महिन्याच्या पगाराइतकी होती, असं पिचाई यांनी सांगितलं.
पिचाई यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरुवातीच्या काळाबद्दलही माहिती दिली. आजच्या पिढीकडे टेक्नोलॉजी आहे, पण त्यावेळी आमच्याकडे काही नव्हते. मी टेक्नोलॉजी शिवाय वाढलो आहे. मी दहा वर्षांचा असेपर्यंत आमच्या करी टेलीफोन नव्हता. अमेरिकेला येईपर्यंत माझ्याकडे कॉम्प्युटर नव्हता. जेव्हा घरी पहिल्यांदा टेलिव्हिजन आले, तेव्हा त्यावर एकच वाहिनी दिसायची, असा अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितला.
दरम्यान, सुंदर पिचाई यांचा जन्म चेन्नईमध्ये झाला आहे. त्यांनी मटेरियल्स इंजीनियर म्हणून आपल्या कामाची सुरुवात केली होती. त्यानंतर 2004 मध्ये ते गुगल कंपनीशी जोडले गेले. 2015 मध्ये त्यांची कंपनीने प्रोडक्ट प्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.