G-7 Organization : चीनला आता ‘जी-७’ ची टक्कर; भारत- पश्चिम आशिया- युरोप कॉरिडॉरच्या निर्मितीचा निर्धार

जगातील आघाडीच्या महासत्तांचा समावेश असणाऱ्या ‘जी-७’ या संघटनेने पायाभूत सुविधांचे जाळे अधिक बळकट करण्यावर भर दिला.
G7 Italia
G7 Italiasakal
Updated on

बारी (इटली) - जगातील आघाडीच्या महासत्तांचा समावेश असणाऱ्या ‘जी-७’ या संघटनेने पायाभूत सुविधांचे जाळे अधिक बळकट करण्यावर भर दिला असून यासाठी ‘भारत- पश्चिम आशिया- युरोप आर्थिक कॉरिडॉर’ला (आयएमईसी) प्रोत्साहन देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यामाध्यमातून चीनच्या ‘बेल्ट अँड रोड’ उपक्रमाला शह देण्यात येईल.

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ‘जी-७’ देशांच्या संमेलनाचा आज समारोप झाला. येथील बोर्गो इग्नाझिया रिसॉर्टमध्ये सदस्य देशांच्या प्रमुखांचे एकत्रित फोटोसेशन पार पडल्यानंतर याबाबतचे संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. भारताच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या संमेलनात सहभागी झाले होते.

वैश्विक पायाभूत सुविधांचा विकास आणि त्यासाठीच्या गुंतवणुकीला प्राधान्य देण्यासाठी सदस्य देश एकवटले असून आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्यावर देखील भर देण्याचे ठरविण्यात आले आहे. लोबितो कॉरिडॉर, लुझॉन कॉरिडॉर, मध्य कॉरिडॉर आणि भारत- पश्चिम आशिया- युरोप आर्थिक कॉरिडॉर यांच्या उभारणीसाठी आर्थिक बळ उभे करण्याचे सदस्य देशांनी ठरविले आहे. ‘युरोपीयन युनियन ग्लोबल गेट वे’, ‘ग्रेट ग्रीन वॉल’सारख्या उपक्रमांना पुढे नेण्यात येईल. इटलीने आफ्रिकेसाठी सुरू केलेला मत्तेई आराखड्याची अंमलबजावणीही करण्यात येणार आहे.

म्हणून चिनी कॉरिडॉरचा धोका

‘आयएमईसी’ कॉरिडॉरमुळे सौदी अरेबिया, भारत, अमेरिका आणि युरोप रस्ते, रेल्वे आणि जहाजमार्गाने परस्परांशी जोडल्या जाणार आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड’ (बीआरआय) कॉरिडॉरला शह देण्यासाठी हा वेगळा कॉरिडॉर तयार केला जात आहे. चीनच्या कॉरिडॉरमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला जात असून यामुळे अनेक देशांच्या सार्वभौमत्व देखील धोक्यात येणार आहे.

मागील वर्षी शिक्कामोर्तब

चीन ‘बीआरआय’च्या माध्यमातून आग्नेय आशिया, मध्य आशिया, रशिया आणि युरोप यांच्याशी जवळीक साधणार आहे. मागील वर्षी भारताने ‘जी-२०’ या संघटनेच्या संमेलनाचे यजमानपद भूषविले होते. तेव्हाच ‘आयएमईसी’ कॉरिडॉरच्या निर्मितीवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले असून या दौऱ्यामध्ये ते नक्कीच गोव्याला भेट देतील अशी आशा आम्हाला आहे.

- प्रमोद सावंत, गोव्याचे मुख्यमंत्री

युक्रेनला आर्थिक बळ

रशियन आक्रमणामुळे युद्धाच्या छायेत सापडलेल्या युक्रेनला आर्थिक मदत करण्यासाठी ‘जी-७’ चे सदस्य देश सरसावले आहेत, यासाठी वेगळी आर्थिक मदत करण्यात येईल. या वर्षाच्या अखेरपर्यंत युक्रेनला ५० अब्ज डॉलरची आर्थिक मदत करण्यात येणार असून यामुळे युद्धग्रस्तांना मोठा दिलासा मिळू शकेल.

पंतप्रधान मोदी मायदेशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक दिवसाचा इटली दौरा आटोपून आज मायदेशी परतले. ‘जी-७’ संमेलनाच्या निमित्ताने त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली तसेच त्यांच्याशी संवादही साधला. इटलीने भारताव्यतिरिक्त अकरा देशांच्या प्रमुखांना या संमेलनासाठी निमंत्रित केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.