Kuwait Fire Accident- कुवेतमध्ये एका इमारतीला लागलेल्या आगीमध्ये ४२ भारतीय कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याच संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. २०२३ मध्ये आडुजीवितम नावाचा एक मल्याळम चित्रपट आला होता. हा चित्रपट सौदी अरेबियातील एका कामगाराच्या संघर्षाबाबत होता. योगायोग म्हणजे या चित्रपटाची ज्याने निर्मिती केली, त्याच्याच्या मालकीच्या इमारतीमध्ये हे ४२ कामगार जळून मेले आहेत.
केरळमधील अब्जाधीश केजी अब्राहम यांनी आडुजीवितम या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला होता. चित्रपटाने जवळपास १५० कोटी रुपयांची कमाई केली होती. कुवेतमध्ये ज्या इमारतीला आग लागली होती की एनबीटीसी कंपनीच्या नावावर आहे. त्याचे सह-मालक केजी अब्राहम आहेत.
केजी अब्राहम हे नासेर मोहम्मद अल-बद्दाह अँड पार्टनर ट्रेंडिग अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे सह-मालक आहेत. या कंपनीची स्थापना १९७७ मध्ये करण्यात आली होती. ही कंपनी इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन, लॉजिस्टिक्स, हॉटेल आणि रिटेलिंग क्षेत्रात काम करते. अब्राहम यांची संपत्ती ४ हजार कोटी रुपये आहे. ते कुवेतमध्ये एक सुपरमार्केट चेन चालवतात. कोचीमध्ये क्राऊन प्लाझा नावाचे त्यांचे एक फाईव्ह स्टार हॉटेल आहे.
मुळचे केरळचे असणारे कट्टुनिलाथ गीवर्गीज अब्राहम यांनी सिविल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला आहे. ते १९७६ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी कुवेतला गेले होते. त्यांनी एका कन्स्ट्रक्शन कंपनीत काम सुरु केलं होतं. सात वर्षानंतर ते एनबीटीसी कंपनीमध्ये पार्टनर झाले. त्यांच्या कंपनीने तेल, गॅस यासह इतर क्षेत्रात आपला व्यवसाय वाढवला. ९० कर्मचाऱ्यांसोबत सुरु केलेली त्यांची कंपनी आता १५ हजार लोकांना रोजगार पुरवते. २०१८ मध्ये केरळमध्ये आलेल्या पुरामध्ये त्यांनी लोकांना मोठी मदत केली होती.
दरम्यान, कुवेतमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर सर्व कामगारांचे पार्थिव भारतात परत आणण्यात आले आहे. मृतांमध्ये सर्वाधिक कामगार केरळमधील आहेत. शुक्रवारी भारतीय हवाई दलाचे विमान ४२ कामगारांचे पार्थिव घेऊन कोची विमानतळावर पोहोचले होते. कामगारांचा मृतदेह जळून पूर्ण खाक झाला होता. सरकारने मृत कामगारांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.