भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्ताननं स्वतःला मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित केलं. असं असूनही पाकिस्तानमध्ये मुजाहिर, शिया आणि इतर गटांसोबत हिंसाचार होत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यादरम्यान एका कार्यक्रमात बोलताना सीतारामन म्हणाल्या, 'भारतातील मुस्लिमांची (Indian Muslim) स्थिती पाकिस्तानपेक्षा (Pakistan) खूपच चांगली आहे.'
निर्मला सीतारामन ह्या रविवारी वॉशिंग्टनमध्ये (Washington) पोहोचल्या आहेत. पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्समध्ये आयोजित कार्यक्रमात निर्मला सीतारामन यांनी भारतातील मुस्लिमांच्या स्थितीवर खुलेपणानं भाष्य केलं.
अर्थमंत्री म्हणाल्या, भारतातील मुस्लिमांची स्थिती खूपच चांगली आहे, लोकांनी भारतात येऊन हे पाहावं, असं त्यांनी आवाहन केलं. भारतात विचारसरणीचा गुंतवणुकीवर परिणाम होतो का? यावर सीतारामन म्हणाल्या, 'याचं उत्तर भारतात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांकडं आहे. गुंतवणूकदार सातत्यानं भारतात येत आहेत. मी एवढंच म्हणेन की, तुम्ही भारतात या आणि काय चाललंय ते पहा.'
PIIE चे अध्यक्ष अॅडम एस. पोसेन यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या, भारत हा दुसरा देश आहे, जिथं सर्वाधिक मुस्लिम राहतात. ही लोकसंख्या सतत वाढत आहे. देशात मुस्लिमांवर अत्याचार होताहेत किंवा त्यात काही तथ्य असेल तर 1947 नंतर भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या सातत्यानं वाढली असती का? असा सवालही त्यांनी केला.
पाकिस्तानचा संदर्भ देत निर्मला सीतारामन म्हणाल्या, भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्ताननं स्वतःला मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित केलं. असं असूनही पाकिस्तानमध्ये मुजाहिर, शिया आणि इतर गटांसोबत हिंसाचार होत आहे.
परंतु, मुख्य प्रवाहातील माध्यमं त्याचं वार्तांकन करत नाहीत. सुनीची (संघटना) अवस्था काही वेगळी आहे, असं मला वाटत नाही.
जर आपण भारताबद्दल बोललो तर तुम्हाला दिसेल की इथं मुस्लिम व्यवसाय करतात, त्यांची मुलं शिक्षण घेत आहेत, त्यांना सरकारकडून फेलोशिप दिली जात आहे, असं सांगत त्यांनी भारतातील मुस्लिमांच्या स्थितीवर खुलेपणानं भाष्य केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.