ओमिक्रॉन विषाणूचे फोटो पहिल्यांदा आले समोर; इटलीत होतंय संशोधन

मानवाप्रमाणं स्वतःला परिस्थितीशी जुळवून घेतोय विषाणू
First_Image_Omicron
First_Image_Omicron
Updated on

नवी दिल्ली : जगाला पुन्हा भीतीच्या छायेत घेऊन जाणाऱ्या ओमिक्रॉन या नव्या कोरोना विषाणूचे फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत. इटालियन संशोधकांच्या टीमने या विषाणूचे फोटो प्रकाशित केले आहेत. या टीमनं म्हटलं, या नव्या फोटोच्या तीन पद्धतींनी अभ्यास केल्यानंतर हा नवा व्हेरियंट स्वतःला मानवाप्रमाणं बदलत असल्याचं हे समोर आलंय. स्वतःला तो परिस्थीतीशी जुळवून घेत आहे. त्याचबरोबर तो सातत्यानं म्युटेट होत असल्याचंही या संशोधकांनी म्हटलं आहे.

मानवी पेशींच्या संपर्कात येतोय हा नवा व्हेरियंट

संशोधकांच्या टीमने म्हटलं की, मानवाच्या शरिरात जिथं प्रथिनं आहेत त्या प्रत्येक भागात ओमिक्रॉन अस्तित्वात असून तो सातत्यानं मावनी पेशींच्या संपर्कात आहे. पण याचा अर्थ असा नाही की, हा खूपच जास्त किंवा कमी धोकादायक आहे. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, हा व्हेरियंट डेल्टा किंवा इतर अन्य व्हेरियंटच्या तुलनेत किती धोकादायक आहे याच्या माहितीसाठी यावर अधिक संशोधन होणं गरजेचं आहे. त्यानंतरच हे कळू शकेल की, हा नैसर्गिक बदल आहे की त्यावर इतर कोणत्या बाबींचा परिणाम होत आहे. संशोधकांनी बोटस्वाना आणि दक्षिण अफ्रिकेत आढळून आलेल्या व्हेरियंटच्या क्रमामध्ये एका अभ्यासाच्या आधारे हे फोटो प्रकाशित केले आहेत.

जागतीक आरोग्य संघटनाही घेतेय शोध

नव्या व्हेरियंटवर जागतीक आरोग्य संघटना देखील अद्याप स्पष्टपणे काही सांगत नाहीए. वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, आत्ता जे काही निष्कर्ष समोर आले आहेत. ते खूपच प्रारंभिक स्वरुपातील आहेत. अशाच कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक अभ्यासाची गरज आहे. वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, विद्यापीठांमध्ये करण्यात आलेले प्रारंभिक संशोधन तरुणांवर करण्यात आलं आहे. तरुणांमध्ये आधीपासूनच अधिक गंभीर आजार नसतात. त्यामुळं यावर विस्तृत अहवाल यायला काही आठवड्यांचा वेळ लागू शकतो. वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, दक्षिण अफ्रिकेत वेगानं संक्रमितांची संख्या वाढत आहे. मात्र, याचं कारण ओमिक्रॉनच आहे की इतर काही हे पण हे शोधणं अद्याप बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.