मानवी रक्तात पहिल्यांदाच आढळलं Microplastics, संशोधकांची चिंता वाढली

Microplastics In Human Blood
Microplastics In Human Bloode sakal
Updated on

मानवी रक्तामध्ये पहिल्यांदाच मायक्रोप्लास्टीक (Microplastics In Human Blood) आढळून आले आहे. ८० टक्के लोकांच्या शरीरारात प्लास्टिकचे सुक्ष्म कण आढळून आले आहेत. तसेच हे मायक्रोप्लास्टिक शरीराच्या एका अवयवातून दुसऱ्या अवयवात जाऊ शकतात किंवा एखाद्या ठिकाणी जमाही राहू शकतात, असे संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

प्रयोगशाळेत मानवी पेशींवर प्रयोग केला असता हे मायक्रोप्लास्टिक शरीराला इजा पोहोचवतात, असे दिसून आले. पण, मानवाच्या रक्तातील मायक्रोप्लास्टिकमुळे मानवी आरोग्यावर नेमका कोणता परिणाम होणार? याचा पूर्णपणे खुलासा झालेला नाही.

नमुन्यांमध्ये PET प्लास्टीक -

मायक्रोप्लास्टिक जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट आणि सर्वात खोल समुद्रापर्यंत पोहोचले आहे. आपण आधीच अन्न, पाणी आणि श्वासाद्वारे लहान कण आत घेतो. त्यामुळे मानवी शरीरात काही प्लास्टिक आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला. त्यानंतर २२ अनोळखी रक्तदात्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यात आली. हे रक्ताचे नमुने लहान मुलं ते वयस्कर नागरिकांचे होते. यापैकी १७ नमुन्यांमध्ये प्लास्टिक आढळून आले. यापैकी अर्ध्या नमुन्यांमध्ये मद्य आणि शीत पेयांसाठी वापरण्यात येणारं PET प्लास्टिक आढळून आलं. याशिवाय फूड पॅकींगसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक Polystyrene एक तृतीयांश नमुन्यांमध्ये आढळून आले. तसेच बॅग बनविण्यासाठी वापरले जाणारे Polyethylene हे एक चतुर्थांश नमुन्यांमध्ये आढळून आले. आपल्या शरीरात प्लास्टिक आहे हे आमच्या प्राथमिक शोधातून लक्षात आले आहे, असे संशोधक प्राध्यापक डिक वेथाक यांनी सांगितले. पण, याबाबत आणखी संशोधन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.