कोरोना विषाणूच्या साथीबाबत सर्वप्रथम सावधानतेचा इशारा चीनने नव्हे तर...

WHO
WHO
Updated on

जिनीव्हा - कोरोना विषाणूच्या साथीबाबत सर्वप्रथम चीनने नव्हे तर चीनमधील आपल्या कार्यालयाने सावधानतेचा इशारा दिल्याची नवी माहिती जागतिक आरोग्य संघटनेतर्फे सांगण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साथीचे उच्चाटन होण्याच्यादृष्टिने माहिती पुरविण्यात संघटना अपयशी ठरली, तसेच चीनबाबत आत्मसंतुष्ट राहिल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओवर केला होता. संघटनेचा निधी रोखण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला होता, पण ट्रम्प यांचे आरोप फेटाळून लावण्यात आले होते.

आता मात्र साऱ्या जगात पसरलेल्या साथीबाबतची माहिती तसेच घटनाक्रम अद्यावत करण्यात आला. त्यानुसार वुहानमध्ये  न्यूमोनियाचे रुग्ण सापडत असल्याची माहिती स्वतः चीनने दिली नाही, असे स्पष्ट होते.

या साथीला दिलेल्या प्रतिसादाबाबत टीका झाल्यानंतर डब्ल्यूएचओने नऊ एप्रिल रोजी माहितीविषयी प्रारंभीचा घटनाक्रम प्रसिद्ध केला होता. ३१ डिसेंबर रोजी हुबेई प्रांतात वुहान महानगरपालिका आरोग्य खात्याने न्यूमोनियाच्या रुग्णांची नोंद केली इतकाच उल्लेख त्यात होता. तशी माहिती कुणी दिली हे मात्र नमूद करण्यात आले नव्हते.२० एप्रिल रोजी डब्ल्यूएचओचे संचालक टेड्रोस घेब्रेयेसूस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यातही पहिला अहवाल चीनमधून आला होता इतकेच सांगितले होते. हा अहवाल चीनच्या अधिकाऱ्यांनी पाठविला की इतर एखाद्या सूत्राकडून मिळाला याचा तपशील त्यांनी दिला नव्हता. या पार्श्वभूमीवर नवा घटनाक्रम प्रसिद्ध करण्यात आला.

नवा घटनाक्रम...

  • डब्ल्यूएचओच्या चीनमधील कार्यालयाकडून विभागीय समन्वय शाखेशी ३१ डिसेंबर रोजी सर्वप्रथम संपर्क
  • वुहानमध्ये न्यूमोनियाची साथ पसरल्याची माहिती
  • वुहान आरोग्य संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसार माध्यमांसाठी देण्यात आलेल्या जाहीर माहितीचा आधार
  • त्याचदिवशी डब्ल्यूएचओच्या जागतिक साथ माहिती सेवा केंद्राला आणखी एक अहवाल मिळाला
  • जागतिक साथीवर लक्ष ठेवणाऱ्या प्रोमेड या आंतरराष्ट्रीय संस्थेकडूनही ही माहिती
  • या अमेरिकास्थित संस्थेचा असाच अहवाल
  • वुहानमध्ये अज्ञात कारणांमुळे न्युमोनियाचे रुग्ण आढळत असल्याची माहिती
  • त्यानंतर डब्ल्यूएचओकडून चिनमधील अधिकाऱ्यांना दोन वेळा विचारणा
  • अशा रुग्णांबद्दल माहिती द्यावी अशी सूचना
  • एक जानेवारी व दोन जानेवारी रोजी त्यासाठी संपर्क
  • तीन जानेवारी रोजी चीनने ही माहिती पुरविली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.