येमेनच्या ३५ मच्छीमारांना मिळाली 'अशी' गोष्ट; जीवनच बदलले!

fishermen found ambergris
fishermen found ambergrisesakal
Updated on

जर तुम्ही समुद्रावर फिरायला गेलात. आणि तिथे एक अमुल्य अशी गोष्ट सापडली तर....हो. अशीच एक घटना येमेनमधील मच्छिमारांच्या आयुष्यात घडली. ज्यामुळे त्यांचे जीवनच पार बदलून गेले आहे. येथील 35 मच्छीमारांना जणू लॉटरीच लागली आहे. (fishermen-founds-ambergris-yemen-nashik-marathi-news)

माशाच्या पोटात हे काय मिळालं?

व्हेल माश्यांची उलटी(fish vomit) त्यांना चक्क भारी पडली आहे. कारण या उलटीचे वजन एक किलो असून त्याची किंमत 35 हजार पौंडाहून अधिक म्हणजे 36 लाखांपेक्षाही जास्त आहे. समुद्रावर मच्छीमारी करता करता ३५ मच्छीमारांना व्हेल माशाचा मृतदेह सापडला. जेव्हा त्यांनी त्या माशाला कापून बघितले. तेव्हा त्या माशाच्या पोटात त्यांना चक्क 127 किलोची एक दुर्मीळ वस्तू सापडली. आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या व्हेलच माशाच्या उलटीमध्ये त्यांना अॅंबरग्रीस नावाची गोष्ट सापडली की जे अत्यंत मौल्यवान मानले जाते. जणू या मच्छीमारांना चक्क समुद्रात तरंगणारे सोने सापडले आहे. ज्या मच्छीमारांना हा सोन्याचा (ambergris) तुकडा सापडला त्याला व्यापाऱ्यांनी 25 कोटी रुपयांची ऑफरही दिली. व्हेल मासा हा आकाराने मोठा असल्याने समुद्रात पाण्याखाली ते पुष्कळशा जीवांना खातात, त्यावेळी त्यांच्या पोटात अंबरग्रीस नावाचा पदार्थ तयार होत असतो. छोट्या जीवांना खाताना या व्हेल माशाला आतील बाजूस दुखापत होत नाही.

मच्छीमारांचे दातृत्व

व्हेल माशाच्या उलटीचा उपयोग परफ्यूम इंडस्ट्री मध्ये केला जातो. त्यामध्ये असलेल्या अल्कोहोलचा वापर महागड्या ब्रँड्सचे अत्तर बनवण्यासाठी केला जातो. त्याच्या मदतीने, परफ्यूमचा वास बराच काळ टिकवून ठेवता येतो. यामुळे, त्याची किंमत खूप जास्त आहे. या अॅंबरग्रीस साठी त्यांना 11 लाख पौंड म्हणजे 11 कोटींपेक्षा जास्त रुपये देण्यात आले असे कळले. या लोकांनी मिळालेले पैसे केवळ आपापसात वाटून घेतले नाहीत तर ते गावातील इतर गरजू लोकांनाही दिले.

fishermen found ambergris
कोरोनामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी प्रशासनाची धावाधाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.