आफ्रिकेत ओमिक्रॉननंतर आणखी एक 'रहस्यमय आजार'; 89 मृत्यूमुखी

आफ्रिकेत ओमिक्रॉननंतर आणखी एक 'रहस्यमय आजार'; 89 मृत्यूमुखी
Updated on

आफ्रिकेत ओमिक्रॉनच्या संकटानंतर आता एक गूढ आजाराचा प्रसार होऊ लागला आहे. आरोग्य व्यवस्थेला चकमा देत या आजाराने सर्वसामान्यांना त्रस्त केलं आहे. दक्षिण सुदानच्या (Malaria in South Sudan) जोंगलेई राज्यातील उत्तरेकडील फंगाक शहरात या आजारामुळे आतापर्यंत 89 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेचीही (World Health Organization) चिंता वाढली आहे. आजारी पडलेल्या लोकांचे नमुने गोळा करण्यासाठी WHO ने शास्त्रज्ञांची रॅपिड अॅक्शन टीम या भागात पाठवली आहे. (Flood in South Sudan)

देशाचे गृह आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री लॅम तुंगवार कुइग्वॉंग यांच्या म्हणण्यानुसार, जोंगलेईच्या सीमेला लागून असलेल्या राज्यात तीव्र पुरामुळे मलेरिया सदृष्य रोगाचा प्रसार झाला आहे. सध्या देशातील मोठा भाग पुराच्या पाण्याखाली आलाय. त्यामुळे महामारी पसरण्यास आणखी हातभार लागला आहे. सध्या मलेरियाने या ठिकाणची परिस्थिती हालाखीची होऊ शकते.

काही ठिकाणी अन्नाअभावी बालके कुपोषणाला बळी पडत आहेत. तर परिसरातील काही क्षेत्रात दूषित पाण्यामुळे त्यामुळे पाळीव जनावरांचाही मृत्यू होत असल्याची माहिती समोर येत आहे. पुरामुळे (Sudan Flood) त्यांना अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तू मिळण्यास अडचण होत आहे.

UN निर्वासित एजन्सी UNHCR ने म्हटलं आहे की, हवामान बदलामुळे आफ्रिकेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय. देशाच्या 60 वर्षांच्या इतिहासातील सर्वात भीषण पुरामुळे 700,000 हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत.

या क्षेत्रात काम करणार्‍या आंतरराष्ट्रीय धर्मादाय संस्थेने Médecins Sans Frontires (MSF) म्हटलं आहे की, पुरामुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे आता आरोग्य सुविधांवर दबाव वाढत आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात चिंता वाढली आहे. 24 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी बोत्सवानामधील एका व्यक्तीमध्ये याची लक्षणं आढळली होती. त्यानंतर आता नव्या आजाराने स्थानिकांचा बळी घेतला आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून जगातील 60 हून अधिक देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळत आहेत. तीन आठवड्यात ओमिक्रॉनमुळे जगातील अनेक देश बाधित झाले आहेत.

मात्र, ओमिक्रॉनमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. ओमिक्रॉनचा वेग डेल्टापेक्षा नक्कीच खूप जास्त आहे, परंतू, त्यातून होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.