Global News: पॅसिफिक महासागरावर दिसल्या उडत्या तबकड्या! वैमानिकांच्या दाव्यानं खळबळ

वैमानिकांच्या दाव्यामुळं गुढ वाढलंय
Flying saucers
Flying saucers
Updated on

न्यूयॉर्क : अमेरिकेतील विविध विमान कंपनीच्या वैमानिकांना गेल्या दोन महिन्यांत प्रशांत महासागरावरून जाताना अनेक वेळा उडत्या तबकड्या दिसल्याचे वृत्त येथील माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. याबाबतची चित्रफितही हाती लागल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. हवाई नियंत्रण विभागाने मात्र त्या तबकड्या असल्याचा दावा फेटाळला आहे. (Flying saucers seen over Pacific Ocean sensational claim of pilots)

Flying saucers
लाईफ संपलेल्या वाहनांवरील होणार दंड माफ; नक्की निर्णय काय? जाणून घ्या

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साऊथवेस्ट एअरलाइन्स आणि इतर काही विमान कंपन्यांच्या वैमानिकांना उडत्या तबकड्या दिसल्या आहेत. आपल्या विमानाच्या वरून अनेक तबकड्या जाताना पाहिले आहे, असे या वैमानिकांपैकी एकाने सांगितले. ‘एक खासगी विमान उडवित असताना काही विमाने उत्तर दिशेला दिसल्याचे आणि ती विमाने गोलाकार फिरत जात असल्याचे मला दिसले,’ असे या वैमानिकाने सांगितले. ही घटना प्रत्यक्ष पहात असताना या वैमानिकाने हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली होती. यानंतर २३ मिनिटांनी याच वैमानिकाला त्याच्या विमानापासून पाच ते दहा हजार फूट उंचीवरून सात तबकड्या वेगाने जाताना दिसल्या.

Flying saucers
'या' भाज्यांमध्ये लपलंय तारुण्याचं गमक

मात्र, हवाई नियंत्रण विभागाने मात्र संबंधित वैमानिकाने विविध प्रवासी विमाने पाहिल्याचा दावा केला आहे. तसेच, त्यावेळी त्याभागातून गेलेल्या वैमानिकांची नावेही आपण देऊ शकतो, असे या विभागाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.