तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी देशातून पलायन केलं. रक्तपात टाळण्यासाठी तालिबानमधून निघाल्याचं अश्रफ घनी यांनी FB पोस्ट करत सांगितलं होतं. मात्र, अश्रफ घनीसाठी धक्कादायक बातमी आहे. अश्रफ घनी यांचा मोठा भाऊ हशमत घनी याने तालिबानसोबत हातमिळवणी केली आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, हशमत घनी याने खलील-उर-रहमान आणि धार्मिक नेते मुफ्ती महमूद झाकीर यांच्या उपस्थितीत तालिबानला पाठिंबा जाहीर केला आहे. मोठ्या भावाचा तालिबानमध्ये प्रवेश अश्रफ घनीसाठी धक्का मानला जात आहे.
रक्तपात टाळण्यासाठी देश सोडत आहे, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, देशाच्या भविष्यासाठी विकास योजनांमध्ये योगदान देत राहतील, असं वक्तव्य घनी यांनी केलं होतं. तालिबानचे राष्ट्रपती अश्रफ घनी सधया आपल्या कुटुंबासह संयुक्त अरब अमिरातीमध्ये वास्तव्यास आहेत. काबुल न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, घनी काबूलमधून पळून गेल्यानंतर अबू धाबी, यूएईमध्ये स्थायिक झाले आहेत. ताजिकिस्तानला घनी वास्तव्यासाठी गेले होते, मात्र विमानाला येथे उतरण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.
तालिबानने कब्जा केल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी अश्रफ घनी यांनी अफगाणिस्तान सोडलं होतं. यावेळी त्यांनी चार गाड्या भरुन पैसे नेल्याचा दावा केला जातोय. सोमवारी रशियन दूतावासाच्या प्रवक्त्या निकिता इश्चेन्को म्हणाल्या, "राजवटीचं पतन ... हे स्पष्ट करते की घनी अफगाणिस्तानातून कसे पळून गेले." चार गाड्या पैशांनी भरलेल्या होत्या, त्यांनी पैशाच्या दुसरी खेप हेलिकॉप्टरमधून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण सर्व काही त्यात बसत नव्हते. दुसरीकडे मात्र, घनी यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
पंजशीर खोऱ्यात सालेह-
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती घनी यांनी देशातून पलायन केल्यानंतर उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह (Amarullah Saleh) यांनी स्वतःला देशाचे काळजीवाहू अध्यक्ष घोषित केले. तालिबानच्या भीतीने अमरुल्लाह सालेह हे अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्यात लपले आहेत. याला नॉर्दन अलायन्सचे माजी कमांडर अहमद शाह मसूदचा गड मानलं जातं. हा भाग इतका धोकादायक आहे की आजपर्यंत तालिबानीही त्यावर कब्जा करू शकलेले नाहीत. पंजशीर असा एकमात्र प्रदेश आहे ज्यावर आजूनही तालिबानचा कब्जा नाहीए. उत्तर-मध्य अफागणिस्तानच्या या खोऱ्यात १९७० च्या दशकात सोव्हिएत संघ किंवा १९९० च्या दशकात तालिबानला कधीच कब्जा करत आला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.