जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांचा नेताजी पुरस्कारानं सन्मान

नेताजी रिसर्च ब्युरोच्यावतीनं रविवारी अबे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जपानचे कॉन्सुल जनरल यांनी हा पुरस्कार स्विकारला.
shinzo-abe
shinzo-abe
Updated on

नवी दिल्ली : नेताजी रिसर्च ब्युरोच्यावतीनं दिला जाणारा यंदाचा नेताजी पुरस्कार २०२२ जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांना रविवारी प्रदान करण्यात आला. कोलकाता येथे आयोजित कार्यक्रमात जपानचे कॉन्सुल जनरल यांनी अबे यांच्यावतीन हा पुरस्कार स्विकारला. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या एल्गिन रोड येथील निवासस्थानी त्यांच्या १२५ व्या जयंती दिनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

जपानचे कॉन्सुल जनरल नकामुरा युटाका यांनी माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावतीन हा पुरस्कार स्विकारला. यावेळी भारतातील जपानचे राजदूत सतोषी सुझूकी यांनी नवी दिल्ली येथून या कार्यक्रमाला व्हर्च्युअली हजेरी लावली.

नेताजी रिसर्च ब्युरोचे संचालक सुगाता बोस जे स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे नातू आहेत त्यांनी या कार्यक्रमात अबे यांचं वर्णन करताना ते नेताजींचे मोठे प्रशंसक असल्याचं म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.