Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्यांदा जीवघेणा हल्ला; थोडक्यात बचावले, नेमकं काय घडलं?

Donald Trump Golf Club Shooting Updates: दुसऱ्यांदा त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. फ्लोरिडा मॅन्शन येथे ते गोल्फ खेळत असताना त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला असं एफबीआयने म्हटलं आहे.
Donald Trump
Donald Trump
Updated on

US Election 2024

वॉशिंग्टन- अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. नऊ आठवड्यांपूर्वी एका निवडणूक सभेदरम्यान त्यांच्यावर हल्ला झाला होता. यात ते थोडक्यात बचावले होते. आता दुसऱ्यांदा त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. फ्लोरिडा मॅन्शन येथे ते गोल्फ खेळत असताना त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला असं एफबीआयने म्हटलं आहे.

ट्रम्प गोल्फ खेळत असताना त्यांच्यावर काही मीटर अंतरावर एक व्यक्ती बंदुक घेऊन उभा असल्याचं यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांना दिसून आलं. त्यानंतर जवानांनी हल्लाच्या तयारीत असलेल्या त्या व्यक्तीच्या दिशेने गोळ्या चालवल्या. त्यानंतर व्यक्ती बंदुक त्याच ठिकाणी सोडून एसयूव्हीमध्ये बसून पळून गेला असं सांगण्यात येतंय. काहीवेळाने त्याला अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.