तालिबाननं काबूलवर कसा कब्जा मिळवला; माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले..

Hamid Karzai
Hamid Karzaiesakal
Updated on
Summary

'राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी तालिबानला काबूलमध्ये बोलावण्यात आलं होतं.'

अफगाणिस्तानचे (Afghanistan) माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई (Hamid Karzai) यांनी काबूलच्या (Kabul) नियंत्रणाबाबत आपलं मत व्यक्त केलंय. राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी तालिबानला (Taliban) काबूलमध्ये बोलावण्यात आलं होतं, असं त्यांनी सांगितलंय. देश अराजकतेच्या गर्तेत सापडू नये, म्हणून तालिबानला काबूलच्या संरक्षणासाठी काबूलमध्ये बोलावण्यात आलं. तसं झालं नसत, तर कदाचित गनीनं दुकानं लुटली असती, देश लुटला असता, असा आरोप करझाई यांनी केलाय.

अफगाणिस्तानचे तत्कालीन संरक्षण मंत्री बिस्मिल्ला खान (Bismillah Khan) यांनी करझाई यांना विचारलं होतं, की तुम्हाला अफगाणिस्तान सोडायचं आहे का? पण, करझाई यांनी अफगाणिस्तान सोडण्यास साफ नकार दिला. 9/11 च्या हल्ल्यानंतर तालिबानला पहिल्यांदा पदच्युत केल्यानंतर हमीद करझाई 13 वर्षे अफगाणिस्तानचे अध्यक्ष आहेत. करझाई म्हणाले, तालिबान सत्तेवर येण्याच्या एक दिवस आधी 14 ऑगस्ट रोजी संभाव्य कराराची एक प्रक्रिया सुरू होती. अब्दुल्ला आणि मी अशरफ गनी (Ashraf Ghani) यांची भेट घेतली. यासाठी त्यांनी सहमती दर्शवली, की ते दुसऱ्या दिवशी दोहाला रवाना होतील आणि सत्तावाटप करारावर स्वाक्षरी करतील, असं ते म्हणाले.

Hamid Karzai
मोठी बातमी! भाजप खासदार उदयनराजेंनी घेतली शरद पवारांची भेट

तालिबानी सैन्य आधीच काबूलच्या सीमेवर होतं. पण, तालिबाननं आम्हाला वचन दिलं की जोपर्यंत करार होत नाही, तोपर्यंत आम्ही काबूलमध्ये येणार नाही. 15 ऑगस्ट रोजी तालिबाननं सांगितलं, की सरकारनं कार्यालयात राहावं आणि आमचा काबूलमध्ये येण्याचा कोणताही हेतू नाही. मात्र, दुपारी २.४५ पर्यंत अशरफ गनी अफगाणिस्तान सोडल्याचं स्पष्ट झाले. यानंतर मी संरक्षण मंत्री, गृहमंत्री, काबूल पोलीस प्रमुख यांना फोन केला. मात्र, तोपर्यंत सर्वजण निघून गेले होते. काबूलमध्ये एकही सरकारी अधिकारी नव्हता, असं ते म्हणाले.

Hamid Karzai
MLC Election : भाजपनं निवडणुकीचं मैदान मारलं; पण एकानं बहुमत हुकलं

गनीच्या सुरक्षा उपप्रमुखांनी हमीद करझाई यांना अफगाणिस्तानचे अध्यक्षपद स्वीकारण्याचं आवाहन केलं. मात्र, करझाईंनी त्यास स्पष्टपणे नकार दिला. अशरफ गनी यांच्या नेतृत्वाखाली शांततापूर्ण तोडगा निघावा यावर आम्ही ठाम होतो, असंही त्यांनी सांगितलं. आम्ही सर्वजण दुसऱ्या दिवशी सकाळी दोहाला जाण्याच्या तयारीत होतो; पण त्याआधीच अशरफ गनी काबूलहून निघून गेले, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.