Jiang Zemin : चीनचे माजी अध्यक्ष झेमिन कालवश

चीनने १९८९ मध्ये तिआनमेन चौकातील आंदोलन क्रूरपणे दडपून टाकल्यानंतर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षात अंतर्गत वाद निर्माण झाले होते
Former President Jiang Zemin pass away in Shanghai china
Former President Jiang Zemin pass away in Shanghai chinasakal
Updated on

बीजिंग : चीनमधील आर्थिक सुधारणांना बळ देणारे माजी अध्यक्ष जिआंग झेमिन (वय ९६) यांचे आज शांघाय येथे निधन झाले. चीनने १९८९ मध्ये तिआनमेन चौकातील आंदोलन क्रूरपणे दडपून टाकल्यानंतर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षात अंतर्गत वाद निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत जिआंग झेमिन यांच्याकडे १९९३ मध्ये चीनचे नेतृत्व आले. त्यांच्याच काळात चीनच्या धोरणात ऐतिहासीक बदल झाले. जागतिक बाजारपेठेला अनुरुप ठरणाऱ्या सुधारणांना त्यांनी बळ दिल्याने चीनमधील आर्थिक विकासाचा वेग वाढला.

त्यांच्याच काळात ब्रिटिशांच्या ताब्यातील हाँगकाँग चीनच्या ताब्यात आला आणि झेमिन यांच्याच अध्यक्षतेखाली चीनचा २००१ मध्ये जागतिक व्यापार संघटनेत समावेश झाला. जिआंग यांच्या सरकारने देशांतर्गत विरोध क्रूरपणे मोडून काढताना शेकडो मानवाधिकार कार्यकर्त्यांना, कामगारांना, आंदोलकांना तुरुंगात डांबले. कम्युनिस्ट पक्षाला धोका वाटणाऱ्या फालुन गाँग या अध्यात्मिक चळवळीवरही त्यांनी बंदी आणली.

झेमिन यांचे यश

झेमिन हे २००३ पर्यंत चीनचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडे १३ वर्षे कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस होते. २००४ मध्ये जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतरही नंतरच्या काळात घडलेल्या अनेक घडामोडींवर त्यांचा प्रभाव होता आणि यातूनच सध्याचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे नेतृत्व पुढे आले. आर्थिक उदारीकरण आणि कठोर राजकीय नियंत्रण हे झेमिन यांचे तत्व जिनपिंग हेदेखील पाळत आहेत. झेमिन यांनी परकी गुंतवणुकीला चालना दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.