Imran Khan jail: इम्रान खान यांना मोठा धक्का; 10 वर्षांचा झाला तुरुंगवास

Pakistan former Prime Minister Imran Khan and Foreign Minister Shah Mehmood Qureshi यांना सरकारी गुपिते लीक केल्याप्रकरणी 10 वर्षांचा तुरुंगवास.
Former Prime Minister of Pakistan PTI Chairman Imran Khan has been sentenced to a 10 year jail
Former Prime Minister of Pakistan PTI Chairman Imran Khan has been sentenced to a 10 year jail
Updated on

इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांना १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिफर प्रकरणात त्यांना ही शिक्षा झाली आहे. त्यांच्यासोबत पीटीआयचे उपाध्यक्ष शाह महुम्मद कुरेशी यांना देखील १० वर्षांची शिक्षा झाली आहे. या शिक्षेमुळे इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याच शक्यता आहे.(Former Prime Minister of Pakistan PTI Chairman Imran Khan has been sentenced to a 10 year jail term)

विशेष कोर्टाने ऑफिशियल सिक्रेट अॅक्टच्या अंतर्गत ही शिक्षा सुनावली असल्याचं पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राने सांगितलं आहे. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्याआधी इम्रान खान यांना झालेल्या या शिक्षेमुळे त्यांच्या पीटीआय पक्षाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

Former Prime Minister of Pakistan PTI Chairman Imran Khan has been sentenced to a 10 year jail
पाकिस्तान-इराणमधील संघर्षाचे कारण काय?

इम्रान खान (वय ७१) आणि कुरेशी (६७) यांना रावलपिंडीच्या अदियाला तुरुंगात ठेवण्यात आले आहे. गोपनीय राजनैतिक कागदपत्रं उघड केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. इम्रान खान यांनी आपल्यावरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला होता.

सिफर प्रकरणाचा संबंध गोपनीय राजनैतिक कागदपत्रांविषयींच्या खुलाशांशी आहे. इम्रान खान यांनी २७ मार्च, २०२२ मध्ये एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना दावा केला होता की, त्यांचे सरकार पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय कट रचला जात आहे. यावेळी त्यांनी काही कागदपत्रे जनतेसमोर ठेवली होती.त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीये.

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने पाकिस्तान तहरीक ए इंसाफ (पीटीआय) पक्षाच्या निधीबाबत तपास केला होता. यात २००३ मध्ये पक्षाला गैरमार्गाने निधी मिळाल्याचा आरोप करण्यात आला. (Latest Marathi News)

Former Prime Minister of Pakistan PTI Chairman Imran Khan has been sentenced to a 10 year jail
Imran Khan : पाकिस्तानात होणारी सार्वत्रिक निवडणूक बनाव ठरेल; इम्रान खान यांची विरोधकांवर टीका

पाकिस्तान मीडियाने दावा केलाय की, इम्रान खान यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक ए इंसाफवर बंदी आणली जाऊ शकते. निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना ही कारवाई जाहीर झाली असल्याने यावरुन पक्षाने लष्करावर आरोप केले आहेत. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.