अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत फसवणूक केल्याप्रकरणी शरणागती पत्करली. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी 2 लाख डॉलर बाँड आणि इतर रिलीझ अटी मान्य केल्या. यानंतर ट्रम्प यांना सोडून देण्यात आले. मात्र यादरम्यान ट्रम्प जवळपास 20 मिनिटे तुरुंगात राहिले.
सुटका झाल्यानंतर ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनीमी काही चुकीचे केले नाही अशी प्रतिक्रिया देखील दिली.
ट्रम्प यांच्यावर जॉर्जिया येथे निवडणूक निकाल बदलण्यासाठी फसवणूक, धमकी देणे आणि बनावटगिरी केल्याचा आरोप आहे. त्यांच्याशिवाय या प्रकरणात आणखी १८ जणांना आरोपी करण्यात आले आहे. इतकेच नाही तर ट्रम्प यांचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मीडोज यांनी दखील आत्मसमर्पण केले आहे. १५ ऑगस्ट रोजी अटलांटा कोर्टाने आरोपपत्र सादर केले. आरोपपत्रात समाविष्ट ४१ आरोपांपैकी १३ आरोपांमध्ये ट्रम्प यांचे नाव आहे.
सीएनएन च्या दाव्यानुसार ट्रम्प यांना एका खोलीत घेऊन जात त्यांचे फिंगरप्रींट घेण्यात आले. त्यानंतर त्यांच मगशॉट (चेहऱ्याचा फोटो) देखील घेण्यात आला. हे डॉक्युमेंट्स कोर्ट आणि पोलिस रेकॉर्ड्सचा भाग बनतील. तसेच जेल रेकॉर्ड्सनुसार माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी फुल्टन काउंटी येथे तुरुंगात टाकण्यात आले होते. तसेच त्यांना कैदी नंब P01135809 म्हणून जेलमध्ये टाकण्यात आलं.
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वर्षातील चौथ्यांदा अटक करण्यात आली. दरम्यान या अटकेनंतर जॉर्जियामधील फुल्टन काउंटी तुरुंगाने ट्रम्प यांचा एक मग शॉट रिलीज केला आहे.
कोर्टात ट्रम्प यांना २५ ऑगस्टपर्यंत सरेंडर करण्यासाठी वेळ देण्यात आला होताय अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांच्यावर पाच महिन्या चार क्रिमिनल केस दाखल करण्यात आहेत. त्यांच्या सोबतच व्हाइट हाऊस चे माजी चीफ ऑफ स्टाफ आणि नेते रुडॉल्फ गिउलियानी यांच्यावर देखील केस दाखल करण्यात आली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, चार्जशीटमझ्ये दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने जाणीवपूर्वक निवडणूकांचे निकाल स्वतःच्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात २०२० सालच्या यूएस निवडणुकीचे निकाल बिघडवण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांची चौकशी करणाऱ्या विशेष वकिलाने 45 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.