मृत्यूपूर्वी कार्डिनल जॉर्ज पेल वादात अडकले होते. बाल लैंगिक अत्याचारात दोषी आढळल्यानंतर ते तुरुंगात सहा वर्षांची शिक्षा भोगत होते.
पोप फ्रान्सिसचे माजी वरिष्ठ सल्लागार कार्डिनल जॉर्ज पेल (Cardinal George Pell) यांचं इटलीची राजधानी रोम (Italy Rome) इथं निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
चर्च अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रियेनंतर हृदयविकाराच्या गंभीर आजारामुळं त्यांचा मृत्यू झाला. कार्डिनल पेल यांनी पोपच्या शीर्ष सहाय्यकांपैकी एक होण्यापूर्वी मेलबर्न आणि सिडनी या दोन्हींचं मुख्य बिशप म्हणून काम केलं.
मृत्यूपूर्वी कार्डिनल जॉर्ज पेल वादात अडकले होते. बाल लैंगिक अत्याचारात दोषी आढळल्यानंतर ते तुरुंगात सहा वर्षांची शिक्षा भोगत होते. त्यांच्यावर दोन किशोरवयीन मुलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. त्यानंतर कोर्टात ते दोषी सिद्ध झाले. मात्र, नंतर त्यांना या आरोपातून मुक्त करण्यात आलं.
पोप फ्रान्सिसचे माजी वरिष्ठ सल्लागार पेल यांना डिसेंबर 2018 मध्ये न्यायाधीशांनी दोषी ठरवलं होतं. यानंतर मार्च 2019 मध्ये सहा वर्षांची शिक्षा झाली. शिक्षा सुनावताना काउंटी कोर्टाचे मुख्य न्यायाधीश पीटर किड यांनी दोन मुलींवर अत्याचार केल्याच्या पेलच्या गुन्ह्याचं वर्णन 'पीडितांवर निर्लज्ज आणि जबरदस्ती लैंगिक अत्याचार' असं केलं. पेलनं पीडितांचा विश्वासघात केला आणि आपल्या अधिकाराचा वापर केला, असं त्यांनी स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.