जेफ बेझोस यांनी एका रात्रीत गमावले 10 अब्ज डॉलर; अ‍ॅलन मस्क यांच्या संपत्तीतही घट

jeff bezos.
jeff bezos.
Updated on

नवी दिल्ली - अमेरिकेतील अब्जाधीशांना मागील काही दिवसांत मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. या अब्जाधीशांना मंगळवारी 93 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. एका दिवसातील हे आतापर्यंतचे नववे सर्वात मोठे नुकसान आहे. अमेरिकेतील महागाईचा दर वाढला असताना ही बातमी आली आहे.

jeff bezos.
Resting in pieces : काँग्रेसमधील फुटीनंतर ‘आप’चं खोचक ट्विट; वाहिली थेट श्रद्धांजली

ब्लूमबर्गच्या अब्जाधीश इंडेक्समध्ये जेफ बेझोस यांना सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यांचे 9.8 अब्ज डॉलर बुडले आहेत. तर इलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीमध्ये 8.4 अब्ज डॉलरची घट झाली आहे. मार्क झुकेरबर्ग, लॅरी पेज, सर्गे ब्रिन, स्टीव्ह बाल्मर या तिघांची 4 अब्ज डॉलर्सने संपत्ती कमी झाली आहे. वॉरन बफेट यांनी 3.4 अब्ज डॉलर्स आणि बिल गेट्स यांनी 2.8 अब्ज डॉलर्स गमावले.

अब्जाधीशांचे दैनंदिन नुकसान यूएस स्टॉक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचं दर्शवित आहे. गुंतवणूकदार दावा करतायत की

jeff bezos.
जास्त ऑफर देऊनही वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये का गेला? उदय सामंत यांनी दिलं स्पष्टीकरण

कंज्यूमर प्राइस इंडेक्ट डेटा अपेक्षेपेक्षा अधिक राहिल्याने मध्यवर्ती बँक व्याजदरात आणखी वाढ करेल. जून 2020 पासून S&P 500 4.4% खाली आहे, तर Nasdaq 100 निर्देशांक, ज्यामध्ये अधिक टेक कंपन्या आहेत, 5.5% खाली आहेत. मार्च 2020 मध्ये 12% घसरल्यानंतर हा उच्चांक आहे.

कोट्यधीशांना या वर्षात अनेकवेळा नुकसान सहन करावं लागलं आहे. गेल्या महिन्यातही अमेरिकन अब्जाधीशांनी एका दिवसात $78 अब्ज गमावले होते. सेंट्रल बँकेचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या आठ मिनिटांच्या भाषणानंतर हे नुकसान झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.