दहशतवादी निज्जरच्या हत्येप्रकरणी आणखी एका भारतीयाला अटक, कॅनडा पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना घेतलं ताब्यात

Hardeep Singh Nijjar Killing: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडा पोलिसांनी आणखी एका भारतीयाला अटक केली आहे. कॅनडाच्या पोलिसांनी आतापर्यंत चार भारतीयांना अटक केली आहे. चौथा आरोपी हत्येचा कट रचणारा असल्याचे सांगितले आहे.
Hardeep Singh Nijjar Killing
Hardeep Singh Nijjar KillingEsakal
Updated on

Hardeep Singh Nijjar Killing: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी चौथ्या भारतीयाला अटक केली आहे. हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौथ्या आरोपीवर यापूर्वीच शस्त्र तस्करीच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत असलेल्या निज्जरच्या हत्येचा आणि कट रचल्याचा नव्याने आरोप ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले आहे. याआधी कॅनडाच्या पोलिसांनी आणखी तीन भारतीयांनाही अटक केली होती.

कॅनेडियन पोलिसांचे तपास पथक, इंटिग्रेटेड होमिसाईड इन्व्हेस्टिगेशन टीम (IHIT) ने सांगितले की त्यांनी अमनदीप सिंग नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे आणि त्याच्यावर कॅनेडियन नागरिक हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवला आहे. याप्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी यापूर्वीच करण ब्रार, कमलप्रीत सिंग आणि करणप्रीत सिंग यांना अटक केली आहे.

Hardeep Singh Nijjar Killing
PM Narendra Modi : ''पाकिस्तानकडून कुणीही अणुबाँब खरेदी करत नाही'', मोदींचा काँग्रेसला टोला, म्हणाले...

आयएचआयटीने सांगितले की, अमनदीप सिंग, ब्रॅम्प्टन, सरे आणि ॲबॉट्सफोर्ड येथे राहणारा 22 वर्षीय भारतीय माणूस आधीच ओंटारियोमध्ये पोलिसांच्या ताब्यात होता. आता त्याच्यावर निज्जरच्या हत्येच्या कटाला पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. तसेच अन्य तीन आरोपींप्रमाणेच अमनदीपवरही हत्येचे गंभीर आरोप आहेत.

Hardeep Singh Nijjar Killing
Video: पंतप्रधान मोदींनी रॅलीदरम्यान महिलेचे केले चरण स्पर्श; कोण आहेत 80 वर्षीय पूर्णमासी जानी?

कॅनडातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर हरदीप सिंग निज्जर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. भारतातील वॉन्टेड दहशतवाद्यांच्या 40 नावांच्या यादीत निज्जरचा समावेश होता. ज्याच्या आधारे कॅनडाच्या सरकारने भारतावर निज्जरच्या हत्येचा आरोप केला.

निज्जरच्या हत्येबाबत कॅनडाच्या सरकारने केलेल्या आरोपानंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधही तणावपुर्ण झाले होते. भारताने जस्टिन ट्रुडो सरकारकडे या हत्याकांडात भारताच्या सहभागाचे पुरावे मागितले आहेत. ट्रुडो यांच्यावर कॅनडात भारताच्या नावावर व्होट बँकेचे राजकारण केल्याचा आरोप आहे.

Hardeep Singh Nijjar Killing
PM Modi Ban: "PM मोदींना 96 तास प्रचारासाठी बंदी घाला"; सिव्हिल सोसायटी गटांची निवडणूक आयोगाकडं तक्रार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.