ऑस्ट्रेलियातील मेलबर्न (Melborn) येथे होणाऱ्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान या देशांच्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला (fourth Quad foreign ministers ministerial) अमेरिकेचे परराष्ट्र सचिव ब्लिंकन (Secy Blinken) हजर राहणार आहेत. फॉरेन मिन मॅरिस पायने याचे आयोजन केले असून विविध मुद्द्यावंर चर्चा होणार असल्याची माहिती यूएस राज्य विभागाच्या पूर्व आशियाई आणि पॅसिफिक व्यवहार ब्युरोच्याचे सहाय्यक सचिव डॅनियल जे. क्रिटेनब्रिंक यांनी दिली आहे.
या तीन लोकशाही देशांसोबतच्या आमच्या भागीदारीतून आम्ही जगभरात लस (Corona Vaccine) वितरीत करण्यासाठी आणि मजबूत आरोग्य पायाभूत सुविधा (Infrasturcture) निर्माण करण्यासाठी वेगाने वाटचाल करत आहोत, असंही डॅनियल जे. क्रिटेनब्रिंक ( यांनी सांगितले. (fourth Quad foreign ministers ministerial in Melbourne, Australia; India, Australia, USA, Japan Participating)
आक्रमकता आणि बळजबरी यांच्या विरोधात या प्रदेशातील सुरक्षित वातावरण मजबूत करत आहोत. या भागीदारीतून आम्ही जागतिक आर्थिक स्थैर्यास मदत करू असेही डॅनियल जे. क्रिटेनब्रिंक म्हणाले
जगाबरोबरच हिंद- प्रशांत भागातील शांतता आणि स्थैर्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचं काम ‘क्वाड’ संघटनेचे सदस्य देश करत असतात. ‘क्वाड’चे सदस्य असणाऱ्या भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांनी समान आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी नव्या उपाययोजना आखण्याची घोषणा करतानाच चीनशी दोन हात करण्याचा इशारा दिला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.