पॅरिस : ओमिक्रॉनचे (Omicron variant) सावट गडद होत चालले आहे. फ्रान्समध्ये (France) दोन दिवसांपूर्वी चोवीस तासात एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण (Corona Patient) आढळून आले आहेत. त्यामुळे संसर्गाला रोखण्यासाठी कडक निर्बंध (Restrictions) लागू केले असून किमान तीन आठवड्यापर्यंत या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
दरम्यान, अनेक देशातील लॉकडाउनमुळे उड्डाणे रद्द झाली आहेत. शुक्रवारपासून ते सोमवारपर्यंत सुमारे ११,५०० उड्डाणे स्थगित करण्यात आली. त्यापैकी ३ हजार उड्डाणे ही एका दिवसातील आहे. फ्रान्समध्ये आज ११०० उड्डाणे स्थगित केले.
युरोपला सर्वाधिक फटका
ओमिक्रॉनचा सर्वाधिक फटका युरोपला बसत आहे. गेल्या सात दिवसात युरोपमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून मृतांची संख्या देखील अधिक आहे. सध्या पाच देशात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण असून ते पाचही देश युरोपातील आहे. डेन्मार्क येथे प्रथमच दररोज रुग्ण आढळून येण्याची संख्या पंधरा हजारावर पोचली आहे. सुमारे ६० लाख लोकसंख्येच्या देशात एक लाखांमागे १६१२ जणांना संसर्ग होत आहे.
जर्मनीत लाठीमार
जर्मनीत ओमिक्रॉनमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर जर्मनी सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या निर्बंधाच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यात काही जण जखमी झाले. कालपासून जर्मनीत सार्वजनिक ठिकाणी, सिनेमा, स्वीमिंग पूल, नाइट क्लब, रेस्टॉरंट, हॉटेल, म्युझियम येथील संख्येवर निर्बंध आणले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.