France Parliament Election : फ्रान्समध्ये सत्तांतराची शक्यता; पहिल्या फेरीतील मतदान पूर्ण

युरोपीय संसदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या रेनेसान्स या पक्षाला जोरदार फटका बसला होता.
France Voting
France Votingsakal
Updated on

पॅरिस - फ्रान्समध्ये संसदीय निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान झाले. फ्रान्समध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच कट्टर उजव्या विचारसरणीच्या पक्षाच्या हाती सत्ता जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मतदानाची दुसरी फेरी सात जुलैला होणार आहे.

युरोपीय संसदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या रेनेसान्स या पक्षाला जोरदार फटका बसला होता. त्यानंतर त्यांनी तातडीने निवडणुकीची घोषणा केली होती. देशात उजव्या विचारसरणीच्या बाजूने वारे असल्याचे या निवडणुकीत दिसून आले होते. त्यामुळे या संसदीय निवडणुकीत फ्रान्समध्ये सत्तांतर होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या नॅशनल रॅली पार्टीच्या नेत्या मरीन ली पेन यंदा विजयासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. फ्रान्समधील महागाईवाढ, अर्थव्यवस्थावाढीचा वेग मंदावणे या मुद्द्यांवरून राग असून सरकारची याबाबतची भूमिका अहंकारीपणाची असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

विरोधकांनी ही अस्वस्थता अचूकपणे टिपून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. याशिवाय, काही डाव्या विचारसरणीचे पक्षही मॅक्रॉन यांच्याविरोधात प्रचार करत आहेत.

मतदानपूर्व कलचाचण्यांचे अंदाज

मतदानपूर्व कलचाचणीमध्ये नॅशनल रॅली पक्षाला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. असे झाल्यास अध्यक्ष मॅक्रॉन यांना नॅशनल रॅलीचे २८ वर्षीय अध्यक्ष जॉर्डन बार्डेला यांना पंतप्रधान म्हणून घोषित करावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com