'हेल्थ कार्ड' बंधनकारक केल्यानं फ्रान्समध्ये निदर्शने

हेल्थ पासची फ्रान्समध्ये २१ जुलैपासून अंमलबजावणी केली जाणार आहे.
 फ्रान्समध्ये निदर्शने
फ्रान्समध्ये निदर्शनेsakal
Updated on

पॅरिस : फ्रान्सची (France) राजधानी पॅरिस (paris) शहरात सध्या ‘कोविड-१९ हेल्थ पास’वरून नागरिक निदर्शने करत आहेत. दोन दिवसांपूर्वी केलेल्या आंदोलनात संतप्त नागरिकांनी तोडफोड केली. काही ठिकाणी पोलिस आणि आंदोलक यांच्यात धुमश्‍चक्री झाली. पॅरिस शहरात सलग तिसऱ्या आठवड्यात आंदोलन सुरू असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. हेल्थ पासची फ्रान्समध्ये २१ जुलैपासून अंमलबजावणी केली जाणार असून नोव्हेंबरमध्ये त्याचा फेरआढावा घेण्यात येणार आहे. (France Protests for Covid-19 health pass)

दीडशे शहरात आंदोलन

दैनंदिन कामासाठी हेल्थ पासची मागणी केली जात असल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. त्यामुळे पॅरिससह सुमारे दीडशे शहरात हेल्थ पासच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. बहुतांश शहरातील आंदोलन हे शांततेच्या मार्गाने झाले. परंतु पॅरिसमध्ये शनिवारी गालबोट लागले. नागरिकांनी पोलिसांवर दगड आणि बाटल्या फेकल्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ पोलिस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची होताना दिसते जमावाला पिटाळून लावण्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि मिरचीच्या स्प्रेचा वापर केला.

 फ्रान्समध्ये निदर्शने
तालिबानकडून दानिश सिद्दिकींचं अपहरण करुन हत्या

हेल्थ पास म्हणजे काय

फ्रान्सच्या संसदेत लोकप्रतिनिधींनी पास केलेल्या विधेयकानुसार सार्वजनिक ठिकाणी हेल्थ पास आवश्‍यक असल्याचे म्हटले आहे. विमानसेवा, संग्रहालय, क्रूझ, चित्रपटगृहे, स्थानिक पर्यटकांसाठी स्पेशल हेल्थ पास घेणे आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेणे बंधनकारक आहे. या पासनुसार लसीकरण किंवा निगेटिव्ह चाचणी अहवाल किंवा कोविडमधून बरे झालेले प्रमाणपत्र असणे आवश्‍यक आहे. तसेच सप्टेंबर मध्यापर्यंत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेणे बंधनकारक आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थ पास वयस्कर नागरिकांसाठी आवश्‍यक आहे. मात्र ३० सप्टेंबरपासून हा नियम १२ वर्षावरील नागरिकांना लागू केला जाणार आहे. एका सर्वेक्षणानुसार बहुतांश फ्रान्सचे नागरिक हेल्थ पासला पाठिंबा देत आहेत तर काहींचा विरोध होत आहे.

कधी मिळाली मंजुरी

फ्रान्सच्या संसदेने २५ जुलै रोजी रात्री नवीन कायद्यावर शिक्कामोर्तब केले. देशातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कायदा करण्यात आला. यानुसार हेल्थ पास जारी करणे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेण्याचे बंधनकारक करण्यात आले. येत्या ९ ऑगस्टपासून हेल्थ पासची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. त्यात लांब पल्ल्याचा प्रवास, रेस्टॉरंट, कॅफे येथे पास अनिवार्य करण्यात येणार आहे.

 फ्रान्समध्ये निदर्शने
हरीतगृह वायू उत्सर्जनात घट करण्यासाठीचा आराखडा देण्यास भारत, चीनला अपयश

फ्रान्सची कोविड स्थिती (रविवार चोवीस तासात)

नवे रुग्ण: १९,६००

नवीन मृत्यू: १८

एकूण बाधितांची संख्या: ६,१४६,६१९

एकूण मृत्यू : १११.८८५

देशात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे हेल्थ कार्डसारखा निर्णय घेणे आवश्‍यक आहे. रुग्णालयातील रुग्णांची संख्या कमी करण्याबरोबरच लॉकडाउनसारख्या स्थितीपासून देशाचा बचाव करणे आणि देशाच्या नागरिकांची सुरक्षा करणे गरजेचे आहे, असे फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅनूएल मॅक्रॉन यांनी सांगितले.

दंड

हेल्थ पासशिवाय प्रवेश करणाऱ्या आणि पहिल्यांदा गुन्हा करणाऱ्या नागरिकास १३५ युरोचा दंड. म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे १२ हजार रुपये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.