अमेरिकेतील राजदूतांना फ्रान्सनं बोलावलं माघारी; 'हे' आहे नाराजीचं कारण

emmanual macron
emmanual macron
Updated on

पॅरिस : अमेरिकेतून राजदूतांना माघारी बोलावीत फ्रान्सचे मित्र पक्ष अमेरिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार फ्रान्सने अमेरिकेतील राजदूतांना परत बोलाविण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातील राजदूतांनाही मायदेशी परतण्याचा आदेश दिला आहे.

ऑस्ट्रेलियाने अमेरिका व ब्रिटनच्या सहकार्याने आण्विक ऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीसाठी नवा करार केला आहे. या ‘ऑकस’ (एयूकेयूएस) करारावरून फ्रान्सने संताप व्यक्त करीत त्याचा जुना मित्र देश अमेरिका व ऑस्ट्रेलियातून राजदूतांना परत बोलाविले आहे. ‘ऑस्ट्रेलियाने अब्जावधी डॉलरचा करार मोडून धोका दिला आहे, असे सांगत असे करणे म्हणजे पाठीत सुरा भोसकण्यासारखे आहे, अशी तिखट प्रतिक्रियाही व्यक्त केली. आशिया-प्रशांत सुरक्षा आघाडी तयार करताना अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाने फ्रान्सला वगळले आहे.

emmanual macron
आंघोळ करताना साबणाच्या फेसामुळे आग; चिमुकला होरपळला

ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेने केलेल्या कराराच्या घोषणेकडे अत्यंत गंभीरतेने पाहत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या आदेशानुसार दोन्ही देशातून राजदूत परत बोलाविण्याचा न्याय निर्णय घेतला आहे, असे फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जिन इव्हज ली डुरिनो यांनी सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांचा हा प्रस्ताव म्हणजे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणासारखाच आहे, अशी तुलना डुरिनो यांनी केली.

emmanual macron
किम जोंग उनला दक्षिण कोरियाचे प्रत्युत्तर; तीन तासांत यशस्वी चाचणी

करार मोडल्याने ६५ अब्ज डॉलरचे नुकसान

डिझेलवरील पाणबुडी निर्मितीसाठी फ्रान्‍स आणि ऑस्ट्रेलियामध्ये १०० अब्ज डॉलरचा सौदा झाला होता. पण नव्या ‘ऑकस’ करारातील शर्तींनुसार ऑस्ट्रेलियासाठी हा सौदा रद्द होणार आहे. यामुळे ६५ अब्ज डॉलरचे नुकसान होणार असल्याने फ्रान्स नाराज आहे. ‘हा सौदा रद्द करण्याचा ऑस्ट्रेलियाचा निर्णय म्हणजे सहकार्य व भागीदारीतील अस्वीकाहार्य वर्तन आहे,’ असे डुरिनो यांनी म्हटले आहे. जगभरात शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या मोठ्या निर्यातदारांपैकी फ्रान्स एक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.