PM Modi Dinner at White House: सलाड, केक अन् बरचं काही...,PMमोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये विशेष डिनरचं आयोजन

शाकाहारी मेन्यू , तिरंगा थीम सजावट; PMमोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये विशेष डिनरचं आयोजन
PM Modi Dinner at White House
PM Modi Dinner at White HouseEsakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. पंतप्रधान मोदींसाठी आज व्हाईट हाऊसमध्ये विशेष डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आदरातिथ्य केलं. तर मोदींसाठी खास जेवणाचा संपूर्ण शाकाहारी मेनू ठेवण्यात आला आहे. (Latest Marathi News)

ज्यामध्ये ग्रिल्ड कॉर्न कर्नल सलाड, स्टफ्ड पोर्टोबेल्लो मशरूमचा समावेश आहे. डेसर्टसाठी मोदींना रोज अॅन्ड कार्डामोन- इनफ्यूस्ड स्ट्रॉबेरी शॉर्टकेक,क्रिस्प्ड मिलेट केक ऑफर करण्यात येणार आहे.(Latest Marathi News)

पंतप्रधान मोदी यांच्यासाठी व्हाइट हाउसमध्ये स्टेट डिनरचे आयोजन करण्यात आलं होतं. शेफ नीना कुर्टिस यांनी हे जेवण बनवले होते. पंतप्रधान मोदींसाठी व्हाईट हाऊसचे कार्यकारी शेफ क्रिस कॉमर फोर्ड आणि व्हाईट हाऊसचे कार्यकारी पेस्ट्री शेफ सूसी मॉरिसन यांनी डिनरचा मेन्यू तयार केला होता.(Latest Marathi News)

PM Modi Dinner at White House
PM Modi US Visit: PM मोदींच्या दौऱ्याचा संपुर्ण खर्च उचलणार अमेरिका! कारण..

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन यांनी सांगितले की, रात्रीच्या जेवणानंतर ग्रॅमी पुरस्कार विजेते जोशुआ बेल यांच्या संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानंतर पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील एक गट भारतीय संगीत सादर करतील.(Latest Marathi News)

तर व्हाईट हाऊसच्या साऊथ लेनमध्ये रात्रीचे जेवण होणार आहे. डिनर जिथे केला जाणार आहे ती जागा तिरंगा थीमने सजवली आहे. तसेच जेवणाचा टेबल हिरव्या रंगात सजवला आहे. त्याच टेबलावर भगव्या रंगाची फुले ठेवली जाणार आहेत.(Latest Marathi News)

PM Modi Dinner at White House
PM Modi US Visit: अमेरिकेच्या विमानतळावर वाजलं जन-गण-मन; PM मोदींची धडाकेबाज एन्ट्री

डिनरमध्ये असणार हा मेन्यू

लेमन डिल योगर्ट सॉस

क्रिस्प्ड मिलेट केक

समर स्कावशेश

मॅरिनेटेड मिलेट

ग्रिल्ड कॉर्न कर्नल सलाड

कंप्रेस्ड वॉटरमेलन

टँगी एवाकाडो सॉस

स्टफ्ड पोर्टोबेल्लो मशरूम

क्रीमी सैफरॉन इन्फ्यूस्ड रिसोट्टो

रोज अॅन्ड कार्डामोन- इनफ्यूस्ड स्ट्रॉबेरी शॉर्टकेक

PM Modi Dinner at White House
PM Modi US Visit: जबरदस्त! 'युएन'मधील मोदींच्या उपस्थितीतील योग दिनाच्या कार्यक्रमादरम्यान गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.