श्रीलंकेत इंधन टंचाईचा पुन्हा बळी

कोलंबोत एका पंपावर इंधनासाठी रांगेत उभे असलेल्या एका रिक्षाचालकाचा मृत्यू
Fuel shortage Sri Lanka again Death of rickshaw puller Economic status of Sri Lanka
Fuel shortage Sri Lanka again Death of rickshaw puller Economic status of Sri Lankasakal
Updated on

कोलंबो : श्रीलंकेत इंधन टंचाईमुळे स्थिती ढासळत चालली आहे. पेट्रोल आणि डिझेलसाठी लोकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. कोलंबोत एका पंपावर इंधनासाठी रांगेत उभे असलेल्या एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. श्रीलंकेची आर्थिक स्थिती गेल्या काही महिन्यांपासून ढासळली आहे. इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. श्रीलंकेतील नागरिकांना पुरेशा प्रमाणात इंधन मिळत नसल्याचे चित्र आहे. देशातील बहुतांश पंपावर रांगा दिसून असून त्यांना अनेक तास इंधनासाठी थांबावे लागत आहे. यादरम्यान कोलंबोत पेट्रोल पंपावरच्या रांगेत असलेल्या ५३ वर्षीय रिक्षाचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

कोलंबोतील दक्षिण उपनगर असलेल्या पनादुरा येथे इंधनासाठी बुधवारी रात्री तो रांगेत लागला लागला होता. मात्र दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी ऑटोत बसलेला असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. सहा महिन्यापूर्वी गॅससाठी रांगेत उभ्या असलेल्या एका ६४ वर्षीय नागरिकाचा गॅस स्टेशनवर मृत्यू झाला होता. दरम्यान, इंधनाच्या टंचाईमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. रेल्वे विभागाची सेवा देखील बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आर्थिक संकटामुळे खाद्यान्न, औषधी, स्वयंपाकाचा गॅस, इंधन, टॉयलेट पेपर एवढेच नाही तर काडीपेटीसारख्या आवश्‍यक वस्तूंची देखील टंचाई निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.