जपानचे PM किशिदा-मोदींची भेट; आर्थिक, सांस्कृतीक मुद्यांवर चर्चा

Fumio Kishida and Narendra Modi
Fumio Kishida and Narendra ModiFumio Kishida and Narendra Modi
Updated on

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांनी शनिवारी (ता. १९) दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. नरेंद्र मोदी आणि फुमियो किशिदा यांच्यात चांगली चर्चा झाली. ज्यामध्ये दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. (Fumio Kishida and Narendra Modi)

१४ व्या भारत-जपान शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा दिल्लीत दाखल झाले. दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. पीएमओकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि फुमियो किशिदा यांच्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधांना चालना देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

ही बैठक भारत आणि जपान यांच्यात भागीदारी वाढवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. शांतता, समृद्धी आणि प्रगतीसाठी भागीदारी केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. याआधी २०१८ मध्ये भारत आणि जपान यांच्यात टोकियो येथे शिखर बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जपानच्या पंतप्रधानांचा हा भारत दौरा अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला जात आहे.

Fumio Kishida and Narendra Modi
नायडू म्हणाले, आमच्यावर शिक्षणाचे भगवेकरण केल्याचा आरोप; पण...

अनेक मुद्द्यांवर चर्चा

सूत्रांच्या माहितीनुसार, युक्रेन संकट, चीन आणि गुंतवणूक यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. वाढत्या आर्थिक सहकार्यासोबतच इंडो-पॅसिफिक क्षेत्रावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर किशिदा यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्याशी चर्चा केली. फुमियो किशिदा रविवारी (ता. २०) कंबोडियासाठी भारतातून रवाना होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.