राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर रोजी होणार अंत्यसंस्कार

Queen Elizabeth Death News
Queen Elizabeth Death NewsQueen Elizabeth Death News
Updated on

लंडन - ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. 19 सप्टेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी अर्थात महाराणी एलिझाबेथ II यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी मेफेअर, लंडन येथे झाला होता. त्या किंग जॉर्ज VI आणि राणी एलिझाबेथ यांचं पहिलं अपत्य होत्या. (Funeral of queen Elizabeth News in Marathi)

Queen Elizabeth Death News
नव्या किंगला विशेष सूट! पासपोर्ट, लायसन्सविना करू शकतील प्रवास अन् बरच काही

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाचे दु:ख लक्षात घेऊन शुक्रवारी मध्य लंडनमध्ये त्यांना तोफांची सलामी देण्यात येणार आहे. राणीचा मुलगा, किंग चार्ल्स तिसरा आणि त्याची पत्नी कॅमिला बालमोरल येथे रात्रभर मुक्काम केल्यानंतर आज लंडनला रवाना होतील. शुक्रवार हा राष्ट्रीय शोकाचा पहिला दिवस असेल. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे गुरुवारी राणीचे निधन झाले. त्या 96 वर्षांच्या होत्या.

Queen Elizabeth Death News
नव्या किंगला विशेष सूट! पासपोर्ट, लायसन्सविना करू शकतील प्रवास अन् बरच काही

विंडसर कोर्ट येथे एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी यांचा राज्याभिषेक सोहळा 1953 मध्ये झाला. ब्रिटिश सिंहासनावर विराजमान होणाऱ्या त्या सहाव्या महिला होत्या. 2 जून 1953 रोजी राणी एलिझाबेथ सिंहासनावर विराजमान झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.