G20 Summit Delhi: बायडन यांचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह; G20 परिषदेसाठी भारताकडं होणार रवाना

व्हाईट हाऊसकडून आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Joe Biden Narendra Modi
Joe Biden Narendra Modiesakal
Updated on

नवी दिल्ली : अमेरिकेच्या प्रथम महिला आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पत्नी जिल बायडन यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पण जो बायडन यांचा कोविड रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. यापार्श्वभूमीवर G20 परिषदेसाठी बायडन भारताकडं रवाना होणार आहेत. त्यासाठी त्यांचं कार्यालय व्हाईट हाऊसकडून आवश्यक ती सर्व काळजी घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. (G20 Summit Delhi Jo Biden Covid Report Negative Will leave for India)

व्हाईट हाऊसनं काय म्हटलंय?

व्हाईट हाऊसनं आपल्या अधिकृत निवेदनात म्हटलं की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे भारत आणि व्हिएतनाम देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) कोविड १९ निर्देशांचे पालन केले जाईल.

Joe Biden Narendra Modi
Maratha Reservation : मनोज जरांगेंची तब्येत बिघडली; वैद्यकीय पथक उपोषणस्थळी दाखल

सलग दोन दिवस बायडन यांची चाचणी करण्यात आली यामध्ये त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळं त्यांचा भारत आणि व्हिएतनामचा दौऱ्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव कॅरिन जीन पियरे यांनी सांगितलं की, राष्ट्राध्यक्षांसोबत जे अधिकारी भारताच्या दौऱ्यावर जाणार आहेत त्यांची देखील कोविड चाचणी केली जाणार आहे.

Joe Biden Narendra Modi
T+1 Settlement नंतर सेबी आणणार नवीन नियम, गुंतवणूकदारांना असा होणार फायदा

भारत दौऱ्यासाठी बायडन उत्सुक

G20 परिषदेत हजेरी लावण्यासाठी बायडन उत्सुक असून ८ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींसोबत त्यांची द्विपक्षीय बैठक होईल. त्यानंतर ९ आणि १० सप्टेंबर रोजी ही परिषद पार पडणार आहे. यामध्ये 20 देशांचे प्रतिनिधी हजेरी लावणार आहेत. पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे येणार नाहीत, तर त्याऐवजी या दोन्ही देशांचे प्रतिनिधी हजेरी लावणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()