COVID Alarm: गर्दीत कोरोना रुग्ण असल्यास वाजणार अलार्म

 Covid19 in crowded spaces
Covid19 in crowded spaces
Updated on
Summary

जगभरात गेल्या जवळपास दीड वर्षांपासून कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. अनेक देशात कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट आली आहे.

लंडन- जगभरात गेल्या जवळपास दीड वर्षांपासून कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. अनेक देशात कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट आली आहे. अनेक तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, आपल्याला आणखी काही काळ कोरोना विषाणूसोबत राहावं लागणार आहे. यादृष्टीने कोरोना रुग्णांचा लवकरात लवकर शोध लावण्यासाठी विविध प्रकारचे संशोधन केले जात आहेत. कोरोना रुग्णांची तत्काळ ओळख पटल्यास पुढील संक्रमण टाळण्यास मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर यूकेतील संशोधकांनी एका इलेक्टॉनिक उपकरणाचा शोध लावला आहे. ज्याच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी केवळ शरीराच्या वासाच्या मदतीने कोरोना रुग्णाची ओळख पटणार आहे. संशोधकांनी याला 'कोविड अलार्म' असं नावं दिलंय. (Gadgets could able to sniff out people infected with Covid19 in crowded spaces)

लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (LSHTM) आणि दुर्हम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या अभ्यासात सांगण्यात आलंय की, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा वास येत असतो. वोलाटाईल ऑर्गेनिक कम्पाऊंडमुळे volatile organic compounds (VOC) असं होत असंत. यामुळे शरीराला एका विशिष्ट प्रकारचा वास येतो आणि सेन्सरच्या माध्यमातून तो डिटेक्ट केला जाऊ जातो. या प्रयोगासाठी ऑर्गेनिक सेमी-कंडक्टिंग organic semi-conducting (OSC) सेन्सर वापरण्यात आले होते.

 Covid19 in crowded spaces
G-7 परिषदेनं चीनचा तिळपापड; म्हणे,'ती वेळ निघून गेली'

प्रयोगातून चांगले परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे या उपकरणाचा वापर सुरु झाल्यास गर्दीच्या ठिकाणी असे सेन्सर वापरले जाऊ शकतात. क्लासरुम, विमानतळ किंवा ऑफिसमध्ये हे उपकरण ठेवले जाऊ शकतात. जेव्हा सेन्सरने विशिष्ट प्रकारचा वास डिटेक्ट केला, त्यावेळी अलार्म वाजेल. हे उपकरण केवळ विषाणूचं अस्तित्व ओळखते, पण नेमकं कोणाला संसर्ग झालाय हे ओळखत नाही. त्यामुळे अशाप्रकारचा अलार्म वाजल्यास त्या ठिकाणच्या सर्व लोकांची कोरोना चाचणी करावी लागेल. तेव्हाच कोणाला विषाणूची लागण झालीये हे कळून येईल.

 Covid19 in crowded spaces
नेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; 12 वर्षांनी नेतान्याहू पायउतार

प्रत्येक आजाराला एका विशिष्ट प्रकारचा वास असतो. कोरोना विषाणूलाही एक वेगळा वास असल्याचं वैज्ञानिकांना समजलं. यावर अधिक अभ्सास करण्यात आला आणि एक उपकरण तयार करण्यात आलं आहे. कोरोना विषाणूच्या लढ्यात हे उपकरण महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. RoboScientific टेक कंपनीच्या माध्यमातून या उपकरणाचा शोध लावण्यात आला आहे. अशाच प्रकारचे उपकरण याआधी कोंबड्यांमध्ये असलेल्या आजाराची ओळख करण्यासाठी वापरण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.