मुंबई: कुख्यात गुंड सुरेश पुजारीला (suresh pujari) फिलिपिन्स (philippines) मध्ये अटक करण्यात आली आहे. मुंबईत सुरेश पुजारीवर ४० गुन्ह्यांची नोंद असून त्यातील १६ गुन्हे हे खंडणीचे आहेत. दिग्दर्शक महेश भट (Mahesh bhatt) यांच्या कार्यालयाबाहेर गोळीबार करण्यामागेही पुजारीचा हात आहे. फिलिपिन्सने भारत सरकारला या अटक कारवाईची माहिती दिली आहे. सुरेश पुजारीला १५ ऑक्टोबरला अटक करण्यात आली. त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबई पोलिसांससह तो सीबीआयच्या रडारवरही होता.
सुरेश पुजारी आधी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीसाठी काम करायचा. दहावर्षांपूर्वी तो रवी पुजारीपासून वेगळा झाला. त्याने स्वत:ची गँग बनवली होती. नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्यातील डान्स बार मालकांना तो पैसे उकळण्यासाठी नियमित फोन करायचा. पैसे न देणाऱ्यांवर गोळीबार करायचा. २०१८ मध्ये त्याच्या शूटर्सनी कल्याण-भिवंडी हाय वे वर के.एन.पार्क हॉटेलला लक्ष्य करुन गोळीबार केला होता. रिसेप्शनवरील एक कर्मचारी या गोळीबारात जखमी झाला होता.
२१ सप्टेंबरपासून सुरेश पुजारी फिलिपिन्स मध्ये असल्याची मुंबई पोलिसांना माहिती मिळाली होती. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून इंटरपोलला अलर्ट केलं होतं. सुरेश पुजारीशी संबंधित सर्व माहिती इंटरपोलला देण्यात आली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.