Israel-Hamas war: रमजानचा पवित्र महिना गाझामध्ये युद्धविराम आणणार? तात्काळ युद्धबंदीची मागणी, UNSC मध्ये ठराव मंजूर

Gaza Ceasefire: युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल (UNSC) ने मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यात गाझामध्ये तात्काळ युद्धविराम करण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला आहे.
Gaza Ceasefire
Gaza CeasefireEsakal
Updated on

Gaza Ceasefire: गाझामध्ये युद्धविराम करण्यासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. परंतु अमेरिकेने या प्रस्तावावर मतदान केले नाही. पण प्रस्तावाच्या बाजुने १४ मते पडली आहेत. हा प्रस्ताव निश्चित लागू झाला पाहिजे, असं युएनएससीचे सरचिटणीस एंटीनिया गुटरेस म्हणालेत.

इस्राइल आणि हमास यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस उग्र होत चाललं आहे. या महायुद्धाचा सर्वात वाईट परिणाम गाझा शहरावर झाला आहे, जिथे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. गाझामध्ये राहणाऱ्या सामान्य नागरिकांना अन्न, झोप आणि उपचारांची गरज आहे. तर 38 हजारांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील देश आणि संघटना इस्राइलकडे युद्धविरामाची मागणी करत आहेत, मात्र इस्राइल आणि हमास आपल्या अटींवर ठाम आहेत.

दरम्यान, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल (UNSC) ने मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यात गाझामध्ये तात्काळ युद्धविराम करण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला आहे. इस्राइल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून सुमारे पाच महिन्यांत प्रथमच परिषदेने असे करण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र, या ठरावावरील मतदानावेळी अमेरिका अनुपस्थित राहिली.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सोमवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत 15 पैकी 14 सदस्यांनी गाझामधील युद्धबंदीच्या ठरावाच्या बाजूने मतदान केले. गाझामध्ये तात्काळ युद्धबंदीचा ठराव 10 कौन्सिल सदस्यांनी संयुक्तपणे मांडला होता. या बैठकीत मतदानादरम्यान अमेरिका अनुपस्थित राहिली.

Gaza Ceasefire
Gaza Ceasefire: संयुक्त राष्ट्रात गाझातील युद्धविरामासाठी प्रस्ताव मंजूर; अमेरिका एकट्याने घेतली वेगळी भूमिका!

प्रस्तावाच्या अटी काय आहेत?

ठरावामध्ये 10 मार्चपासून सुरू झालेल्या "रमजान महिन्यासाठी तात्काळ युद्धविराम" करण्याची मागणी करण्यात आली. ठरावात "सर्व ओलीसांची तात्काळ आणि बिनशर्त सुटका" करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्र संघात काल (सोमवारी) संमत झालेल्या या ठरावामुळे पहिल्यांदाच सुरक्षा परिषदेने उघडपणे युद्धबंदीचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला हमासने इस्राइलवर दहशतवादी हल्ला केला तेव्हा इस्रायइने हमास या दहशतवादी संघटनेवर पूर्ण ताकदीने हल्ले करण्यास सुरुवात केली. इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासच्या प्रत्येक हल्लेखोराचा खात्मा होईपर्यंत युद्ध सुरूच ठेवण्याची शपथ घेतली आहे.

Gaza Ceasefire
ISKP Threat to India: भारतीय प्रार्थनास्थळांमध्ये रक्तपात करण्याची ISKP ची भारताला धमकी

इस्राइल हा प्रस्ताव स्वीकारणार का?

इस्राइल संयुक्त राष्ट्रात मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करेल का? हा देखील मोठा प्रश्न आहे. कारण यूएनमध्ये आणलेल्या ठरावात हमासच्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केलेला नाही. यामुळे इस्राइलला राग येऊ शकतो. दुसरीकडे, या प्रस्तावावर अमेरिकेने म्हटले होते की, हमासचा पाठिंबा मिळविण्यासाठी संयुक्त राष्ट्रात आणलेल्या कोणत्याही ठरावात हमासचा निषेध समाविष्ट करणे आवश्यक आहे.

यूएनमध्ये आणलेल्या गाझा युद्धबंदीच्या ठरावात हमासवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी गाझातील नागरिकांबद्दल बोलले गेले. गाझामध्ये इस्रायली हल्ल्यांनंतर "नागरिकांना हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे" असे या ठरावात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. आम्ही सर्व दहशतवादी कृत्यांचा निषेध करतो. प्रस्तावात असे म्हटले आहे की नागरिकांना ओलीस ठेवणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे.

Gaza Ceasefire
Pandemic News : दुसरी महामारी कधीही धडकू शकते...; युकेमधील शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.