Gaza War: इस्राइलचा पलटवार अन् गाझा पट्टीत मृतदेहांचा खच; निष्पाप नागरिकांचे हाल पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Gaza War
Gaza Warsakal
Updated on

Gaza War: गाझापट्टीमध्ये सध्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. ‘घरामध्ये बसलो तरीसुद्धा हवाई हल्ल्याचा धोका आणि बाहेर पडावे तरीसुद्धा बाँबहल्ल्यात मरण पावण्याचा धोका,’ अशा दुहेरी संकटामध्ये आम्ही सापडलो आहोत,’ अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करताना दिसतात.

‘हा आमच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे पण त्यावर उत्तर नाही’ अशी हतबलतेची भावना रुग्णालयात काम करणाऱ्या जमाल (वय ३४) यांनी व्यक्त केली. आमच्यासाठी आता एकही सुरक्षित जागा उरलेली नाही किंवा एकही हक्काचे ठिकाण राहिलेले नाही, असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

इस्राईलने हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर आता गाझापट्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले आहे. उत्तरेकडील भागामध्ये राहणाऱ्या तब्बल दहा लाख लोकांनी दक्षिणेकडे स्थलांतर सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या स्थलांतराबाबत संयुक्त राष्ट्रांनी आधीच सावधगिरीचा इशारा दिला होता.

लोकांनी मिळेल ते वाहन पकडून तसेच गाढवांच्या गाड्यांत बसून दक्षिणेकडे स्थलांतर सुरू केले आहे. इस्राईलने शुक्रवारी रात्रीपासूनच गाझामध्ये खोलवर मारा करायला सुरूवात केली आहे. या स्थलांतर करत असलेल्या लोकांवर देखील इस्राईलने बाँबवर्षाव केला असून त्यात सत्तरपेक्षा अधिक स्थानिक लोक मारल्या गेल्याचा दावा ‘हमास’कडून करण्यात आला.

Gaza War
Israel–Hamas war: इस्राइल-हमास संघर्षाला गंभीर वळण? इस्लामिक राष्ट्रांची 'तातडीची महत्त्वाची बैठक' सौदीत

‘हमास’ने काही इस्रायली नागरिकांना ओलिस ठेवले असून त्यांची सुटका करण्यासाठीच लष्कराने गाझापट्टीमध्ये घुसण्याचा निर्णय घेतला आहे. गाझामध्ये खोदण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या बंकरला लक्ष्य करण्याचा इस्रायली लष्कराचा इरादा आहे.

लष्करी अधिकाऱ्यांचे मौन

इस्राईलचे लष्कर गाझाच्या सीमेवर पोचले असले तरीसुद्धा थेट आत घुसायचे की नाही? याबाबत कोणताही अधिकारी अधिकृतपणे काहीही बोलायला तयार नाही. गाझापट्टीमध्ये शिरल्यानंतरदेखील इस्रायलींसाठीचा संघर्ष सोपा नसेल. येथेही त्यांना मोठा विरोध होऊ शकतो अशी भीती वर्तविली जात आहे. दाट लोकवस्ती असणाऱ्या भागामध्ये थेट मारा करताना इस्राईलला विचार करावा लागेल.

हिज्बुल्ला संघटना हमासच्या साथीला

इराणचा पाठिंबा असलेल्या हिज्बुल्लाने इस्राईलविरोधातील युद्धामध्ये हमासच्या खांद्याला खांदा लावून लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आम्ही या संघर्षासाठी तयार आहोत, असे हिज्बुल्लाचा उपप्रमुख नईम कासीम याने म्हटले आहे. आता हिज्बुल्लाने या संघर्षात थेट उडी घेतल्याने या युद्धाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

करार गुंडाळणार

इस्राईल आणि हमास यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने इस्राईलसोबतचा बहुचर्चित करार गुंडाळल्याची चर्चा आहे. सौदीने आता त्यांच्या परराष्ट्रधोरणाचाच फेरआढावा घ्यायला सुरूवात केली असून सौदी आता इराणच्या अधिक जवळ गेल्याचे बोलले जाते. सौदीचे युवराज मोहंमद बिन सलमान यांनी इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

Gaza War
Israel-Gaza Conflict: इस्रायल आणि गाझा यांच्यातला वाद नक्की काय आहे ? त्याचा इतिहास काय आहे ?

जनता आक्रमणासाठी आग्रही

इस्राईलमधील जनमत मात्र गाझावर थेट हल्ला व्हावा म्हणून आग्रही दिसते. लष्करी कारवाईचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी इस्रायली दूरचित्रवाणी वाहिन्यांनी वेगळ्या केंद्रांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील कार्यक्रमांतून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या गाथा सांगितल्या जात आहेत. रस्त्यारस्त्यांवर उतरलेले लोक देशभक्तीच्या घोषणा देत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

जखमींचे स्थलांतर अशक्य

इस्रायली लष्कराच्या हल्ल्यामध्ये गाझापट्टीतील अनेक नागरिक हे जखमी झाले असून, त्यांच्यासाठी स्थलांतर करणे हे तितकेसे सोपे नसेल. सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या नागरिकांना आम्ही बाहेर काढू शकत नाही, असे आरोग्यमंत्रालयाचे प्रवक्ते अश्रफ अल किदरा यांनी सांगितले. विशेष म्हणजे जखमींमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश असल्याचे बोलले जाते.

पत्रकाराचा मृत्यू

इस्राईलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दक्षिण लेबनॉनमध्ये रॉयटर्स या वृत्तसंस्थेचा एक पत्रकार ठार झाला तर अन्य सहाजण जखमी झाले. जखमीत ‘अल जझीरा’ व ‘एएफपी’च्या पत्रकारांचा देखील समावेश आहे. अलमा अल शाब या भागामध्ये या पत्रकारांनी तळ ठोकला होता. याच भागात हेजबोल्ला आणि इस्रायली लष्करामध्ये चकमक सुरू आहे. या पत्रकारांच्या मृत्यूसाठी लेबनॉनचे पंतप्रधान नजीब मिकाती यांनी इस्राईलला जबाबदार ठरविले आहे.

Gaza War
Gaza Declares War : राष्ट्रीय सुरक्षा मंत्र्यांनी इस्राईलमध्ये केली आणीबाणीची घोषणा; आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.