अमेरिकेतील वंशद्वेषाचा बळी ठरलेल्या जॉर्ज फ्लॉइड (George Floyd) या कृष्णवर्णीय व्यक्तीला अखेर न्याय मिळाला आहे. डेरेक शॉविन हा पोलिस आधिकारी दोषी आढळला आहे. जॉर्ज फ्लॉइड याच्या हत्येप्रकरणी डेरेक शॉविन या माजी पोलिस आधिकाऱ्याला 22 वर्ष सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी जॉर्ज फ्लॉइड यांचा पोलिसांच्या अत्याचारात मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेसह जगभरात ‘ब्लॅक लाइव्हज् मॅटर’ ही चळवळ पसरली होती. हा अत्याचार वंशद्वेषातूनच झाल्याचेही उघड झाले होते. दोषी आढळल्यानंतर न्यायालयाने डेरेक शॉविन याला शिक्षा सुनावली आहे.
संघराज्यातील नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून फ्लॉइड कुटुंबाने मिनियापोलिस प्रशासनाविरोधात गेल्या वर्षी जुलै महिन्यात खटला दाखल केला होता. याचिकार्त्यांनी डेरेक शॉविन याला 30 वर्षाच्या शिक्षेची मागणी केली होती. मात्र, याधीही तो कोणत्याही गुन्ह्यामध्ये आरोपी असल्याचा रेकॉर्ड नाही. त्यामुळे न्यायाधीशीने त्याला 22 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 17 वर्षांच्या ड्रॅनेला फ्रेझर या मुलीने जे घडलं ते मोबाइलवर चित्रित केलं आणि समाजमाध्यमांमुळे ते झटक्यात घराघरात पोचलं. यामध्ये तो, मी वाईट माणूस नाही, मला मारू नका, माझं प्रेम आहे असं माझ्या मुलांना सांगा, हेच तो पुन्हा पुन्हा काकुळतीने पोलिसांना सांगत होता, असं दिसत आहे.
गेल्यावर्षी २५ मे रोजी जॉर्ज फ्लॉईडच्या मानेवर जवळजवळ ९ मिनिटे पोलिस अधिकारी डेरिकने दाब दिल्याने मरण पावला. वीस डॉलरची खोटी नोट दुकानात जॉर्जने दिल्यावर दुकानातल्या कुणीतरी पोलिसांना फोन केला आणि त्यानंतर हे रामायण घडलं. जॉर्जच्या मानेवर गुडघ्याचा दाब देऊन पोलिस अधिकारी डेरिक बसलेला असताना तिथे असलेली माणसं जॉर्जला सोडून द्यावं, अशी विनंती करत होती. त्याला श्वास घेणं कठीण झालं आहे, त्याचा जीव जाईल असं जिवाच्या आकांताने ओरडून सांगत होती. ‘मला श्वास घेता येत नाहीये, मला मारू नका,’ हेच जॉर्जचे अखेरचे शब्द होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.