जॉर्जला अखेरचा निरोप; आईच्या थडग्यापाशीच दफन केला मृतदेह

george floyd, george floyd funeral, America
george floyd, george floyd funeral, America
Updated on

ह्यूस्टन : आफ्रिकन वंशीय अमेरिकन जॉर्ज फ्लॉयड याच्यावर ह्यूस्टन येथील एका चर्चमध्ये श्रद्धांजली वाहिल्यानंतर अत्यंसंस्कार करण्यात आले. जॉर्ज फ्लॉयड श्रद्धांजली वाहण्यासाठी जवळपास पाचशे लोक याठिकाणी जमा झाले होते. या लोकांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर फ्लॉयडचा मृतदेह त्याच्या आईचा अंत्यविधी झालेल्या ठिकाणाजवळच दफन करण्यात आला. जॉर्ज फ्लॉयडची सहा वर्षांची मुलगी जियाना आपल्या आईसोबत शोक सभेत सहभागी झाली होती. त्या बाल मनाला ठाउकही नाही की तिचे बाबा समाजातील घृणास्पदा भेदभावाचे नाहक बळी ठरले आहेत. जॉर्जच्या अशा जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. फ्लॉयडच्या स्मरणार्थ टेक्सास सदर्न यूनिवर्सिटीने त्याच्या मुलगीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. 

25 मे रोजी अमेरिकेतील मिनियापोलिस येथील पोलिस कोठडीत जॉर्ज फ्लॉयड याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर वर्णद्वेषाचा मुद्दा समोर आला. अमेरिकेसह जगभरातील अन्य देशात त्याच्या मृत्यूचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी लॉकडाउन असतानाही लोक रस्त्यावर उतरतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.   
हातात बेड्या असणाऱ्या जॉर्ज फ्लॉटडची मान आपल्या गुडघ्याखाली दाबून ठेवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये संबंधित अधिकाऱ्याने आठ ते दहा मिनिटे जॉर्जची मान दाबून ठेवल्याचे दिसते. यावेळी जॉर्ज श्वास गुदमरत असल्याचे सांगतानाही व्हिडिओमध्ये ऐकायला मिळाले होते. जॉर्जची हालचाल बंद झाल्यानंतरही पोलिस अधिकारी डेरेक चाउविन याने त्याला दाबून धरले होते.   

मागील दोन आठवड्यांपासून जॉर्ड फ्लॉयड नाव जगभरात गाजत आहे. जॉर्जच्या मृत्यूची घटना ही वर्णभेदासारख्या किळसवाण्या प्रकाराचा खात्मा करण्याची नवी मोहिम सुरु झाली आहे. पांढऱ्या अश्व रथातून जेव्हा फ्लॉयडला अंत्यविधीसाठी आणण्यात येत होते त्यावेळी कडक उन्हाची पर्वा न करता लोक त्याच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसून आले.   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()