काबूल : अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलमधील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Kabul Airport) झालेल्या हल्ल्यानंतर जगभरातील देशांनी रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली. मात्र, अफगाणिस्तानातून लोकांना बाहेर काढण्यात स्पेनला यश आल्यानं त्यांनी बचाव मोहीम तुर्तास थांबवण्याचा निर्णय घेतला. विमानतळावरील आत्मघातकी हल्ल्यात अमेरिकन सैन्यासह एकूण 110 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. दरम्यान, स्पेननंतर आता जर्मनी, स्वीडननं देखील अफगाणमधील आपली बचाव मोहीम (Evacuation Mission Kabul) थांबवली असून अमेरिका, ब्रिटनसह इतर देश मात्र 31 ऑगस्टपर्यंत ही बचाव मोहीम सुरु ठेवणार आहेत.
अफगाणिस्तानला ताब्यात घेतलेल्या तालिबान्यांनी बचाव मोहिमेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची देशांना मुदत दिली आहे.
अफगाणिस्तानला ताब्यात घेतलेल्या तालिबान्यांनी बचाव मोहिमेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची देशांना मुदत दिलीय, तर दुसरीकडं 31 ऑगस्टपर्यंत हल्लेखोरांकडून नागरिक आणि सैन्याला पुन्हा लक्ष्य केलं जाऊ शकतं, असंही बोललं जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्पेनसह जर्मनी आणि स्वीडनं देखील आपली बचाव मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला. स्पेन सरकारनं सांगितलं की, अफगाणिस्तानातून दुबईत दोन लष्करी विमानं आल्यामुळं आमचं स्थलांतर ऑपरेशन थांबवत आहोत. आताही काबूल विमानतळावर संशयास्पद हालचाली होण्याची शक्यता निर्माण झाल्यानं आम्ही ही मोहीम तुर्तास थांबवण्याचा निर्णय घेतलाय.
पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता
बाॅम्ब हल्ल्यांमुळे काबूल विमानतळावर आणखी दहशतवादी हल्ले होऊ शकतात. अमेरिकन ब्रॉडकास्ट कंपनीच्या (ABC) मते, विमानतळाच्या उत्तर गेटवर कार बॉम्बस्फोटाचा धोका निर्माण झाला असून अशा परिस्थितीत काबूलमधील अमेरिकन दूतावासाने नवीन अलर्टही जारी केला आहे.
ब्रिटनचे हजार लोक सुखरुप
काबूल विमानतळावर तीन आत्मघाती बॉम्बस्फोटांनंतर, ब्रिटननं स्पष्ट केलंय की ते अफगाणिस्तानातील बचाव मोहीम काही तासांत संपवतील. ब्रिटीश संरक्षण सचिव बेन वालेस म्हणाले, आम्ही आमच्या लोकांना बाहेर काढत आहोत. सुमारे 1,000 लोक आता विमानात सुखरुप आहेत. शिवाय, आम्ही गर्दीतून काही लोक शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्याकडे काहीच तास शिल्लक असल्याचंही त्यांनी 'स्काय न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. तर, जर्मनीने एकूण 45 देशांच्या 5,347 लोकांना बाहेर काढलं. यात 4,000 पेक्षा जास्त नागरिक अफगाणिस्तानचे आहेत.
ISIS-K च्या हालचालींवर लक्ष्य ठेवण्याचे आदेश
दरम्यान, काबुलमध्ये अमेरिकेचं ऑपरेशन सुरूच असून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) म्हणाले, आमच्या कमांडरांना ISIS-K वर लक्ष्य ठेवण्यास सांगितलं असून त्यांच्या योजना उद्ध्वस्त करण्याचेही सक्त आदेश दिले आहेत. आमचे सैन्य ही मोहीम फत्ते करतील, अशी आशा आहे. 31 ऑगस्टपर्यंत काबूलमधील बचाव ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी आपण अजूनही कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.