स्फोटकांच्या ट्रकला दुचाकीची धडक होऊन झालेल्या भीषण स्फोटानंतर परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
घानामध्ये (Ghana) भीषण स्फोट झाला असून यात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट (Blast) इतका भयंकर होता की यामध्ये १० ते १२ इमारती जमीनदोस्त झाल्या तर शेकडो इमारतींचे नुकसान झाले आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये १७ जण मृत्यूमुखी पडले असून ५९ जण जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एक ट्रक सोन्याच्या खाणीत स्फोटकं नेत होता. त्यावेळी ट्रकची धडक मोटारसायकलला झाली. यानंतर मोठा स्फोट झाला. सोशल मीडियावर आता स्फोटाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पोलिसांनी याबाबत सांगितलं की, प्राथमिक चौकशीत असं समोर आलं की, खाणीसाठी स्फोटकं नेणाऱ्या ट्रकला दुचाकीची धडक बसली. त्यानंतर झालेल्या स्फोटात १७ जणांनी प्राण गमावले. लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून इतर सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आलं आहे. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत सुरक्षित स्थळी राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
घानामध्ये याआधीही असा एक स्फोट झाला होता. २०१७ मध्ये नैसर्गिक वायू नेणाऱ्या टँकरला आग लागली होती. तेव्हा तिघांचा मृत्यू झाला होता. तर २०१५ मध्ये एका पेट्रोल पंपावर स्फोट झाला होता. त्यात पुरासारख्या आपत्तीपासून वाचण्यासाठी पंपावर येऊन थांबलेल्या दीडशे लोकांचा मृत्यू झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.