घनी यांना तालिबानकडून माफी

अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर तालिबानच्या दहशतवाद्यांना नागरिकांच्या विद्रोहाला सामोरे जावे लागत आहे
घनी यांना तालिबानकडून माफी
sakal
Updated on

काबूल : अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर तालिबानच्या दहशतवाद्यांना नागरिकांच्या विद्रोहाला सामोरे जावे लागत आहे. अशातच देशातून पलायन केलेले अफगाणिस्तानचे माजी अध्‍यक्ष अश्रफ घनी आणि उपाध्यक्ष अमरूल्ली सालेह यांना सार्वत्रिक माफी देण्याची घोषणा तालिबानने केली आहे. त्याचबरोबर ते दोन्ही नेते अफगाणिस्तानला परत येऊ शकतात, अशी थोडी मवाळ भूमिकाही घेतली आहे.

घनी यांना तालिबानकडून माफी
Podcast: ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट ते काय आहे शरिया कायदा?

तालिबानचा वरिष्ठ नेता खलिल उर रहमान हक्कानी याने पाकिस्तानमधील ‘जिओ न्यूज’ या खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत घनी, सालेह न राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्ला मोहिब यांनाही माफी दिली. ‘‘कोणत्याही समुदायाशी तालिबानचे शत्रूत्व नाही. घनी, सालेह आणि मोहिब यांना तालिबानचा धर्मावर आधारित विरोध होता. दुसऱ्या देशांच्या सैन्याशी हातमिळवणी करीत लढणारे जनरल असोत वा सामान्य जनता, आम्ही सर्वांना माफ केले आहे.

अश्रफ घनी यांनी दुबईत आश्रय घेतला घेतला असून सालेह हे अफगाणिस्तानमधील पंजशीर खोऱ्यात तळ ठोकून तालिबान्यांशी हिमतीने लढा देत आहेत. खलिल उर रहमान हक्कानी हा ‘हक्कनी नेटवर्क’ या दहशतवादी संघटनेचा संस्थापक जलालुद्दीन हक्कानी याचा भाऊ आहे. अमेरिकेने त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले असून त्याच्यावर ५० लाख डॉलरचे (सुमारे ३७ कोटी रुपये) इनाम जाहीर केलेले आहे.

घनी यांना तालिबानकडून माफी
तालिबानी आणि विरोधकांमध्ये आम्ही पडणार नाही; रशियाची भूमिका

तालिबान्यांनी अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर रहमान खुलेआम काबूलमध्ये फिरत आहे. काबूलच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारीही त्याच्यावर आहे. ‘मी सूड उगवणार असल्याची अफवा शत्रू पक्ष पसरवित असून नागरिकांनी देश सोडून जाऊ नये, असे आवाहन हक्कानीने केले आहे. ताजिक, बलूच, हजारा आणि पश्‍तून हे सर्वजण आमचे बांधव आहेत. ते अफगाणी असल्याने देशात परत येऊ शकतात, असा पवित्राही त्याने घेतला.

हक्कानीची घोषणा; अफगाणिस्तानचे दरवाजे खुले

सर्वसमावेशक सरकार

हक्कानी म्हणाला की, अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकार स्थापन केले जाईल. त्यात सर्व वर्गांना स्थान दिले जाईल. सरकारमध्‍ये सुशिक्षित लोकांचा समावेश केला जाईल. सर्व मुस्लिम देशांमध्ये एकता आणि सहकार्य असावे, असे तालिबानला वाटते. तालिबानने शत्रूंवर मोठा विजय मिळविला आहे, असा दावाही त्याने केला.

हक्कानीचे बोल...

व्यवस्‍थेत बदल करणे हे आमच्या विरोधाचे एकमेव कारण

आमचा लढा हा संस्कृती, धर्म आणि देशाच्या रक्षणासाठी आहे

तालिबानने अमेरिकेविरोधात युद्ध पुकारलेले नाही

अमेरिकेने आमच्यावर हल्ला केला

अमेरिका आमच्‍या आणि देशाविरुद्ध शस्त्रास्त्रांचा वापर करीत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.