Giorgia Meloni : नाईट क्लबमध्ये केली नोकरी, जोडीदारानेही साथ सोडली, जाणून घ्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबद्दल

जॉर्जिया मेलोनी आज इटलीसारख्या प्रगतीपथावर असलेल्या देशाच्या पंतप्रधान आहेत
PM Giorgia Meloni
PM Giorgia Meloniesakal
Updated on

Giorgia Meloni :

एक अशी महिला जिच्या आईला ती नकोशी होती. त्यामुळे आईने तिला पोटातच मारण्याचा विचार केला होता. इतकेच नाहीतर जगण्यासाठी या मुलीने मिळेल ते काम केले. तिच्या जोडीदारानेही तिची साथ सोडली, अशी मुलगी जीवनात खडतर प्रवास करत अतिउच्च पदावर विराजमान होते, ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही.

जॉर्जिया मेलोनी आज इटलीसारख्या प्रगतीपथावर असलेल्या देशाच्या पंतप्रधान आहेत. आणि ही त्यांची कथा आहे. यशामागे असलेला संघर्ष फार कमी लोकांना दिसतो. तसंच, जॉर्जिया यांच्याबाबतीत घडलं आहे. जॉर्जिया आईच्या गर्भात असतानाच हे जग सोडून गेल्या असत्या. कारण, त्यांच्या आईला वाटत नव्हत की तिने जन्माला यावं. पण, असं काय घडलं की ही मुलगी जन्माला आली आणि इतकी यशस्वी झाली.

PM Giorgia Meloni
PM Modi Italy: तिसरा कार्यकाळ सुरू होताच पीएम मोदी परदेश दौऱ्यावर, जाणून घ्या किती महत्त्वाचा आहे इटली दौरा

जॉर्जिया यांचा जन्म 1977 मध्ये इटलीची राजधानी रोममधील गरबाटेला येथे झाला. जॉर्जिया यांचा राजकीय प्रवास सर्वांनाच माहिती आहे. पण, फार कमी लोकांना त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल माहिती आहे. जॉर्जिया यांनी गेल्यावर्षी एक आत्मचरित्र लिहीलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

त्या म्हणतात की, माझा खरा संघर्ष मी जगात येण्याआधीच सुरू झाला होता. कारण मी आईच्या पोटात असताना आईला मी नकोशी झाले होते. जिथे बाळ सर्वात सुरक्षित असतं त्या आईच्या पोटात मी असुरक्षित होते. कारण, आईने गर्भपाताचा विचार केला होता. पण, तिने हा निर्णय शेवटच्या क्षणी बदलला आणि माझा जन्म झाला.  

PM Giorgia Meloni
PM Modi Salary : पंतप्रधानांना देखील भरावा लागतो टॅक्स? कॅबिनेटमंत्री, राज्यमंत्री यांच्या पगारामध्ये नेमका फरक काय

मेलोनीची आई एक कादंबरीकार आहे आणि तिने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्या मुलींना प्रोत्साहन दिले. इतर मुलांप्रमाणे मेलोनीचे जन्मानंतरचे आयुष्यही सामान्य नव्हते. मेलोनीचे वडील आई आणि दोन मुलींना एकटे सोडून कामासाठी गेले.  त्यानंतर ते परत कधी आलेच नाहीत. त्यानंतर मेलोनीने तिचे संपूर्ण आयुष्य वडिलांशिवाय घालवले.

पंतप्रधान मेलोनी यांनी लहानपणापासूनच घरची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली. मेलोनी तिच्या आई आणि बहिणीला घर चालवायला मदत करायची आणि लहानपणापासूनच ती कमावणारी बनली. मेलोनी नाईट क्लबमध्ये बारटेंडर म्हणूनही काम करत होती. त्याबद्दल मेलोनी म्हणतात की, हे पद, संसद आता आलं आहे, पण माझं खरं जीवन, शिक्षण एका बारमधील काऊंटरच्या मागेच झाले आहे.

'जॉर्जिया मेलोनी यांनी राजकीय कारकिर्द 1992 मध्ये सुरू झाली होती.  इटालियन सोशल मूव्हमेंट MSI च्या युवा विंगमध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर त्या राजकीय विश्वात एकामागून एक यशाची शिडी चढू लागल्या.

यूथ विंगमध्ये सामील झाल्यानंतर, त्या नंतर उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थी गट स्टुडंट ॲक्शनच्या नेत्या बनल्या. ज्यानंतर मेलोनी वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी खासदार झाल्या. 2006 मध्ये त्या संसदेत पोहोचल्या. वयाच्या 29 व्या वर्षी खासदार झाल्यानंतर मेलोनीने आणखी एक इतिहास रचला आणि अवघ्या दोन वर्षांनंतर वयाच्या 28 व्या वर्षी त्या इटलीतील सर्वात तरुण मंत्री बनल्या. बर्लुस्कोनी यांच्या चौथ्या सरकारमध्ये त्यांना युवा व्यवहार मंत्री करण्यात आले.

PM Giorgia Meloni
Giorgia Meloni: यूरोपात इस्लामला स्थान नाही; इटलीच्या PM मेलोनी यांचा जुना VIDEO व्हायरल

स्वत:चा पक्ष उभारला

2011 मध्ये बर्लुस्कोनीचे सरकार पडल्यानंतर मेलोनी यांच्याकडे तीन पर्याय होते, पहिला म्हणजे बर्लुस्कोनीला पाठिंबा देणे. दुसरे म्हणजे राष्ट्रीय युती मजबूत करण्यासाठी पाठिंबा देणे. आणि तिसरे म्हणजे, मेलोनी यांनी स्वीकारलेला मार्ग म्हणजे स्वतःचा पक्ष स्थापन करणे. याच मार्गावर मेलोनी चालल्या होत्या. आणि प्रत्येक अडचणीला तोंड देत त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला.

2011 मध्ये बर्लुस्कोनीचे सरकार पडल्यानंतर मेलोनी यांनी ब्रदर्स ऑफ इटली हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. परंतु, पक्ष स्थापन होताच यश मिळू लागले असे घडले नाही, उलट 2013 साली पक्षाला केवळ दोन टक्के मते मिळाली होती. पण मेलोनी यांनी पक्षाचे मनोबल कायम राखले आणि संघर्ष सुरूच ठेवला.

PM Giorgia Meloni
Italy PM Georgia Melony: मेलोनीबाईंना हवी ९० लाखांची भरपाई; इटलीच्या पंतप्रधानांचे डीपफेक व्हिडिओ, त्या पैशांचा करणार असा वापर

सत्तापालट होण्यासाठी जॉर्जियाने एक संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. जो तिच्या यशात मोलाचा दगड ठरला. ‘'मी जॉर्जिया आहे, मी एक महिला आहे, मी आई आहे, मी इटालियन आहे, मी ख्रिश्चन आहे.’ असे ती प्रत्येकवेळी म्हणत राहीली आणि लोकांनी तिला स्विकारलं. त्यानंतर 2022 मध्ये मेलोनीच्या पक्षाने 119 जागा जिंकल्या आणि मेलोनी पंतप्रधानपदावर विराजमान होणारी पहिली महिला ठरली.

ती सिंगल मदर आहे

मेलोनीने तिच्या घोषणेमध्ये वारंवार सांगितले आहे की ती सिंगल मदर आहे. देशाच्या पंतप्रधानासोबतच मेलोनी या महिलांसाठी प्रेरणास्थान बनल्या. एकटी आईच मुलाची आणि देशाची काळजी घेऊ शकते, हा मुद्दा त्यांनी देशासमोरच नव्हे तर संपूर्ण जगासमोर वारंवार मांडला.

मेलोनी यांची मुलगी जेनेव्हरा हिचा जन्म 2016 मध्ये झाला होता. तिच्या पुस्तकात जिनेवराच्या वडिलांचा उल्लेख करताना मेलोनी म्हणतात की, जिनेवराचे वडील 41 वर्षीय पत्रकार एंड्रिया जिआम्ब्रुनो आहेत. आम्ही एका मुलाखतीदरम्यान भेटलो होतो. जीवनातील 10 वर्ष आम्ही एकत्र होतो. पण आमचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही, आणि आम्ही वेगळे झालो.

आज जॉर्जिया यांच्या नावाचा यशस्वी महिलांच्या यादीत प्रथम उल्लेख केला जातो. पण, पंतप्रधान पदापर्यंत पोहोचणं सोप्पी गोष्ट नसली. तरी जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर ते काम अवघडही नाही हेच जॉर्जिया यांच्याकडे पाहून लक्षात येतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com