अफगाणमध्ये मुलींना शिक्षण नाही; UNच्या सुरक्षा परिषदेनं व्यक्त केली चिंता

afghan
afghansakal
Updated on

नवी दिल्ली : गेल्यावर्षी अफगाणिस्तानची सत्ता तालिबानने काबीज केल्यानंतर मुलींच्या शिक्षणात अडथळे न आणण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. मात्र, त्यांच्या या घोषणेवरून घूमजाव करत तालिबानने इयत्ता सहावीपुढील मुलींना शिक्षणसंस्थांत प्रवेश न देण्याचा निर्णय त्यांनी काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. अफगाणिस्तानातील नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी तालिबानच्या अधिकाऱ्याने यासंदर्भात अधिकृत स्पष्टीकरण दिलं होतं. (Taliban) त्यांच्या या निर्णयावर आता संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी यावर आता चिंता व्यक्त केली आहे.

afghan
खळबळजनक! नाशिकमध्ये बंद गाळ्यात सापडले मानवी अवयव

इयत्ता सहावीच्या वरील मुलींना शिक्षणासाठी प्रवेश नाकारला जाणार असल्याचा अहवाल चिंताजनक असल्याचं त्यांनी म्हटलंय. फक्त मुलींचेच नव्हे तर सर्वच अफगाण लोकांना शिक्षणाचा अधिकार असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे. तालिबानने आधी आश्वासन दिल्याप्रमाणे शिक्षणाचा आदर करण्याचं आवाहन सुरक्षा परिषदेनं केलं असून अधिक विलंब न करता सर्व वयोगटातील मुलींसाठी शाळा पुन्हा सुरु करण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे.

त्यांनी SRSG ला विनंती केली आहे की, UNAMA च्या आदेशानुसार, या मुद्द्यावर संबंधित अधिकाऱ्यांसह संबंधित सर्व अफगाणी राजकीय नेत्यांशी संवाद साधत राहावे आणि सुरक्षा परिषदेला यासंदर्भातील घडामोडींची माहिती द्यावी. सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी अफगाणिस्तानच्या लोकांसाठी तसेच अफगाणिस्तानचे सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली आहे.

तालिबानच्या या निर्णयामुळे मुलींना शाळांचे दरवाजे खुले करण्यासह महिलांना सार्वजनिक ठिकाणी त्यांचे अधिकार बहाल करण्याचे आवाहन करणाऱ्या जागतिक समुदायाला धक्का बसला आहे. समुदायाने तालिबानच्या निर्णयाचा निषेध केला आहे. अफगाणिस्तानच्या शिक्षण मंत्रालयाने नुकतेच एक निवेदन जारी करून सर्व विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचे आवाहनही केले होते. मात्र, शिक्षण मंत्रालयाकडून नव्या शैक्षणिक वर्षाची पूर्वतयारी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर तालिबानने मंगळवारी (ता.२२) रात्री उशिरा हा अनपेक्षित निर्णय जाहीर केला.(Taliban)

afghan
रशियात आम्हाला सत्तांतर नको; ‘व्हाइट हाउस’चे घूमजाव

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता पुन्हा काबीज केली होती. तेव्हापासून इयत्ता सहावीपुढील शिक्षण घेण्यास विद्यार्थिंनीवर बंदी घालण्यात आली. यावर्षी काही विद्यापीठेही सुरू झाली. परंतु, सत्ता काबीज केल्यापासून तालिबानचे आदेश अनिश्चित राहिले आहेत आणि अफगाणिस्तानातील मूठभर प्रांतांनी सर्वांना शिक्षण देणे सुरू ठेवले आहे. बहुतेक प्रांतातील शिक्षणसंस्थांनी मुली व महिलांसाठी आपले दरवाजे बंद केले आहेत. देशाची राजधानी काबूलमध्ये मात्र शाळा व विद्यापीठे कोणत्याही अडथळ्यांशिवाय सलगपणे सुरू आहेत. धार्मिक वृत्तीने चालणाऱ्या तालिबान प्रशासनाला इयत्ता सहावीपुढील मुलींची नोंदणी केल्याने त्यांचा आधार नष्ट होण्याची भीती आहे. (Taliban)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()