रिओ दी जानेरिओ - ब्राझीलमध्ये आयोजित केलेल्या जी-२० परिषदेच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे आज प्रथमच एकमेकांना भेटले. यावेळी दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. ब्रिटनमधील बेलफास्ट आणि मँचेस्टर येथे दोन नव्या वकिलाती सुरू करणार असल्याचे मोदी यांनी यावेळी जाहीर केले. तसेच, भारतात आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेले फरार उद्योगपती विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांना भारताच्या ताब्यात देण्याचे आवाहनही मोदी यांनी केले.