'लस द्या, हिलसा घ्या'; बांगलादेशच्या भूमिकेमुळं भारतीय खवय्ये नाराज!

भारताकडून लस पुरवठा कमी झाल्यानं बांगलादेशकडून अडवणूक
Hilsa Fish
Hilsa FishFile Photo
Updated on

नवी दिल्ली : भारतातील मासेप्रेमींच्या ताटातील 'हिलसा मासा' हा आवडीचा मेन्यू!. भारत हा मासा प्रामुख्याने बांगलादेशकडून आयात करतो. पण सध्या थो भारतीयांना उपलब्ध होत नाहीए, कारण बांगलादेशनं याचा पुरवठा कमी केलाय. यामागील कारणं ऐकून तुम्ही चक्राऊन जालं. हो याचं कारण म्हणजे बांगलादेशला भारताकडून सध्या कमी प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा होत आहे. यामुळेच या देशाकडून हिलसा माशाची निर्यातही कमी करण्यात आली आहे. (Give vaccine take Hilsa Indian eater annoyed over Bangladesh Hilsa diplomacy)

Hilsa Fish
"'वर्ल्ड रेकॉर्ड'साठीच मोदी सरकारकडून लसींची साठेबाजी?"

बांगलादेशमध्ये सध्या १६ लाख जनतेला भारतीय लस देण्यात आली आहे. मात्र, सध्या भारतानं बांगलादेशला कळवलंय की आम्ही जास्त प्रमाणात लस पुरवू शकत नाही. बांगलादेशमधील सुत्रांच्या माहितीनुसार, भारताकडून लस पुरवठा कमी झाल्यानं बांगलादेशमध्ये नाराजी आहे. त्यामुळे इथल्या प्रसिद्ध हिलसा माशाच्या पुरवठ्यावर मर्यादा आणण्यात आली आहे. आनंद बाझार पत्रिकानं याबाबत वृत्त दिलं आहे.

बांगलादेशची हिलसा डिप्लोमसी चुकीची

काही दिवसांपूर्वी हिलसा माशावर भारतात बंदी घालण्यात आली होती. पण गेल्या वर्षी शेख हसिना सरकारनं 'जमाई शास्ती' या बंगालमधील उत्सवासाठी भारताला २ टन हिलसा मासा पाठवण्यास विशेष परवानगी दिली होती. पण यावर्षी हे घडणार नाही कारण बंगाली माणसाला यंदा पद्मा नदीतला (बांगलादेशमध्ये गंगा नदीला पद्मा म्हणतात) हा खास मासा उपलब्ध होणार नाही. पण काही तज्ज्ञांच्या मते, लस पुरवठ्या अभावी हिलसा माशाच्या पुरवठा रोखणं चुकीचं आहे. म्हणजेच दोन देशांमधील संबंध हे हिलसा डिप्लोमसीमुळं बिघडले आहेत.

ममता बॅनर्जींनी शेख हसिनांना केली होती विचारणा

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या काही दिवसांपूर्वी बॉर्डर अॅग्रीमेंटसाठी ढाक्या दौऱ्यावर होत्या, तेव्हा त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना मजेत विचारलं होतं की, "त्यांच्या जेवणाच्या मेन्यूमध्ये हिलसा माशाचे अनेक प्रकार का आहेत?" यावर हसिना म्हणाल्या होत्या की, "ज्यावेळी तिस्ता नदीची पाण्याची पातळी वाढते तेव्हा हिलसा बंगालपर्यंत पोहोण्यास सक्षम होतात."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.