बांग्लादेशमधील हिंदूंचे भवितव्य टांगणीला ?

बांग्लादेशच्या संसदेतील 300 जागांपैकी सुमारे 50 जांगांवर त्यांचा प्रभाव आहे.
Bangladesh Violence
Bangladesh Violenceesakal
Updated on

बांग्लादेशमध्ये दुर्गापूजेच्या मंडपावर व हिंदु देवतांच्या मंदिरांवर झालेले हल्ले भारताच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनलाय. ``हल्ले करणाऱ्या तत्वांची गय केली जाणार नाही व त्यांना कठोर शासन केले जाईल,’’ अशी ग्वाही बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी दिली असली, तरी तेथील हिंदूंचे भय कमी झालेले नाही. बांग्लादेशच्या एकूण 17 कोटी लोकसंख्येपैकी दहा टक्के हिंदू म्हणजे 1.70 कोटी हिंदू आहेत. बांग्लादेशच्या संसदेतील 300 जागांपैकी सुमारे 50 जांगांवर त्यांचा प्रभाव आहे.

शेख हसीना गेली बारा वर्षे पंतप्रधान असून, त्यापूर्वी 1996 ते 2001 या दरम्यान त्या पदावर होत्या. बांग्लादेशमधील आवामी लीगच्या लोकप्रिय नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात. भारतामध्ये अल्पसंख्यांकांना मिळणाऱ्या वागणुकीची ही प्रतिक्रिया असावी, अशी शंका उपस्थित केली जाते. परंतु, हिंसाचाराच्या या घटनांकडे पाहता, हिंसाचार करणाऱ्यांचे हेतू वेगळे आहेत, असे दिसते.

Bangladesh Violence
नशीब फळफळले : एका झटक्यात झाला 'तो' 15 करोडचा मालक

तेथे झालेल्या अटकेतून नव्या गोष्टी प्रकाशात आल्या आहेत. बीबीसीचे माजी पत्रकार व बांग्लादेश तज्ञ सुबीर भौमिक यांनी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे, की देशात धार्मिक दंगे करून, हसीना यांच्यापुढे राजकीय आव्हान उभे करून, त्यांची प्रतिमा डागाळणे, हा हेतू आहे. माजी पंतप्रधान खालेदा झिया यांचा बांग्लादेश नॅशनॅलिस्ट पक्ष व मूलतत्ववादी जामत ए इस्लमी यांनी मिळून 2000 व 2001 मध्येही हिंदूंना लक्ष्य करून, ``त्यांचे रक्षण करण्यास अथवा त्यांना सुरक्षा देण्यात शेख हसीना अपयशी ठरत आहेत,’’ असे चित्र निर्माण केले होते.

कोम्मिला येथे हिंदूच्या पूजा मंडपात हनुमानमूर्तीच्या पायाशी इक्बाल हुसेन याने कुराणाची प्रत ठेवली, (इस्लामची बदनामी झाली, असा आरोप केला). त्याची छायाचित्रे फेसबुकवर टाकणारा फैय्याझ अहमद हा अऩेक वर्ष सौदी अरेबियात राहिलेला आहे. कुराणाची प्रतही सौदी अरेबियात प्रकाशित झालेली व ती फैय्याझ याची आहे. तिसरा, कमालुद्दीन अब्बासी, ज्याने चांदपूर येथील दंगेखोरांचे नेत्रुत्व केले, त्याने पोलिसांकडे सारे कबूल केले. जामत ए इस्लामी हा पाकप्रणित पक्ष असून, बांग्लादेशच्या स्वातंत्र्यालाही या पक्षाने विरोध केला होता. बांग्लादेशला अस्थिर करण्यासाठी पाकिस्तानची जी कारस्थाने चालू आहेत, त्याचाच हल्ले हा एक भाग आहे.

बांग्लादेश व भारताचे संबंध सौहार्दपूर्ण आहेत. बांग्लादेशच्या निर्मितीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ढाका येथे झालल्या समारंभाला उपस्थित राहाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली, तेव्हाही याच तत्वांनी भारताविरूद्ध निदर्शने केली. 1971 युद्धात बांग्लादेशातील मुक्ती बाहिनीला भारताने दिलेले साह्य व पाठिंबा आजही काट्यासारखा या तत्वांना व खालेदा झिया यांना बोचतोय.

दुसरीकडे, चीन कोणती न कोणती प्रलोभने दाखवून बांग्लादेशला आपलेसे करू पाहात आहे. त्याला आजवर प्रतिकूल प्रतिसादच मिळत आलाय. हसीनांचे राजकीय धोरण धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुऴे हिंदू व मुसलमान सर्वसाधारणतः सलोख्याने राहात आहेत. दोन्ही देशांना जोडणाऱ्या सुमारे पन्नास नद्या आहेत. त्यातील मासेमारीच्या वाटपाबाबतही दुतर्फा समझोता आहे. समझोता झालेला नाही, तो तीस्ता नदीतील पाण्याच्या वाटपाचा. त्याचे प्रयत्न चालू आहेत. डॉ मनमोहन सिंग पंतप्रधान असल्यापासून पश्चिम बंगालच्या मुखमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीस्ताच्या संदर्भात दाखविलेला विरोध कायम आहे. हसीना नाराज आहेत. तथापि, याबाबतचे मतभेद त्यांनी संबंधांआड येऊ दिलेले नाहीत.

Bangladesh Violence
तालिबान राजवटीत ४० व्यापाऱ्यांचे अपहरण

बांग्लादेशमध्ये 2023 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे, विरोधकांनी वातावरण तापविण्यास सुरूवात केली आहे. धार्मिक तणाव निर्माण करण्याचे कारस्थान जोर धऱीत आहे. या वातावरणात, तेथील हिंदू बांग्लादेशीयांचे भवितव्य टांगणीला लागणार काय, असा प्रश्न उपस्थित होतो. गेल्या पन्नास वर्षात दोन्ही धर्मियात टोकाचा तणाव निर्माण झालेला नाही, ही समाधानाची बाब होय. मात्र खालेदा झिया यांच्या हाती शासनाची सूत्रे गेल्यास परिस्थिती बदलू शकते, याची जाणीव आपल्याला ठेवावी लागेल. बंगबंधू मुजीबूर रहमान यांना आजही इस्लामी पक्ष `पूर्ण इस्लामी’ नेता मानीत नाही (अन इस्लामिक).

दरम्यान, हिंदूविरूद्ध झालेल्या हिंसाचार व दंग्यांकडे पाहता, हसीना यांनी हिफाजत ए इस्लाम व जामत ए इस्लामच्या नेत्यांना अटक केली असून, त्यांच्यावर जाळपोळ, लूटमार व खूनाचे आरोपही दाखल करण्यात आलेत. हसीना यांच्या सरकारमधील एका कनिष्ट मंत्र्याने अलीकडे जाहीर केले, की 1988 मध्ये बांग्लादेशमध्ये इस्लाम हा राष्ट्राचा धर्म असेल, अशी माजी जनरल एचएम इर्शाद यांनी केलेली घटनादुरूस्ती रद्द करण्यात येणार आहे. त्यांच्या वक्तव्यानुसार, ``बांग्लादेश पुन्हा 1972 मधील घटनेतील धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या घोषणेकडे वाटचाल करील.’’ या घोषणेमुळे तेथील वातावरण पुन्हा तणावग्रस्त होण्याची शक्यता आहे. आवामी लीगचा तिला पाठिंबा आहे. तिला संसदेत मान्यता घ्यावयाची असेल, तर आवामी लीगला असलेल्या बहुमताने ते शक्य होईल. त्याबाबत त्या कोणते पाऊल टाकतात, ते पाहावयाचे. हसीना यांना ठार करण्याचे आजवर 19 प्रयत्न झाले आहेत. असे असूनही अत्यंत धीराने नेतृत्व करून त्यांनी बांग्लादेशला गतीमान विकसनशील देश बनविले आहे.

हिंदूविरूद्ध झालेल्या हिंसाचाराचा संयुक्त राष्ट्रसंघ व पाश्चात्य देशांनी निषेध करून त्यांना अभय देण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे इस्कॉन ने (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉनशसनेस) जगातील त्यांच्या दीडशे केंद्रातून या हिंसाचाराचा निषेध केला आहे. नोआखालीमधील इस्कॉन केंद्रावरही या तत्वांनी हल्ला चढविला.

दिल्लीत अलीकडे 1971 च्या युद्धाचा विजय दिवस साजरा झाला. त्या निमित्ताने `ह्युमॅनिटेरियन, पॉलिटिकल अँड डिप्लोमॅटिक फॅसिट्स ऑफ द 1971 वॉर’ या विषय़ावर `स्वर्णिम विजय वर्ष कॉनक्लेव 2021’ हा परिसंवाद झाला, त्यात बोलताना परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला म्हणाले, की भारत-बांग्लादेश दरम्यान असलेली व्यूहात्मक भागीदारी अऩ्य कोणत्याही भागीदारी पेक्षा अधिक गहन आहे.

Bangladesh Violence
दिल्लीच्या सीमांवरील बॅरिकेड्स हटवले; पोलिसांनी सांगितले कारण...

हिदूंविरूदध झालेल्या हिंसाचाराबाबत भारताने चिंता व्यक्त केली असली, तरी कारस्थान करणाऱ्यांना हसीना सरकार अटक करून निश्चितच न्याय करतील व त्यांना सुरक्षा व अभय देण्यासाठी आवश्यक ती पावले टाकतील अशी खात्री वाटते

गेल्या महिन्यात येथील प्रेस क्लब मध्ये बंगबंधू मुजीबूर रहमान यांच्या नावे पत्रकारांना कामकाज करता यावे, यासाठी संगणक आदी सर्व सोयींनी उपलब्ध असलेले केंद्र उभारण्यात आले. त्याचे उद्घाटन करण्यासाठी बांग्लादेशहून माहिती व नभोवाणी मंत्री डॉ. हसन महंमद खास येथे आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.