Chemical attack in Douma: सिरियावर केमिकल अ‍ॅटॅकचा ठपका! जागल्याचा अहवालानंतर खळबळ

सिरियानं केलेल्या रासायनिक हल्ल्यात अनेकांना प्राण गमवावे लागले होते.
douma-syria
douma-syria
Updated on

हेग : आपल्याच देशातील ड्यूमा शहरावर २०१८ मध्ये केमिकल बॉम्ब टाकल्याचा ठपका सिरियावर ठेवण्यात आला आहे. रासायनिक अस्त्रांवर प्रतिबंध घालणाऱ्या 'ग्लोबल केमिकल वेपन्स' या जागल्या संस्थेनं शुक्रवारी या घटनेबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला, यामध्ये हा ठपका ठेवण्यात आला आहे.

हा अहवाल मोठ्या प्रतिक्षेत होता, अखेर त्यानं सिरियाला आरोपीच्या पिंजऱ्यात अडकवलंच. (Global chemical weapons watchdog blames Syria for 2018 deadly chlorine attack in Douma)

सिरियन एअरफोर्सनं ७ एप्रिल २०१८ मध्ये विमानातून ड्यूमा शहरावर क्लोरिनचे दोन पिवळे सिलेंडर्स टाकले होते. हे सिलेंडर्स दोन इमारतींवर पडल्यानं त्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. क्लोरिन हा विषारी वायू असल्यानं या घटनेत त्या इमारतीतील ४३ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तसेच डझनभर लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागले होते.

douma-syria
Kasba Bypoll : कसब्यात भाजप 'या' पाचपैकी एकाला देणार संधी; केंद्रीय समितीकडे पाठवला प्रस्ताव

दरम्यान, या घटनेचा तपास करताना तपास अधिकाऱ्यांनी ७० पर्यावरणीय आणि बायोमेडिकल सॅम्पल तपासले. ६६ प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यात आले तसेच इतर डेटा न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठवण्यात आला होता. त्याचबरोबर सॅटेलाईट इमेजेस तपासण्यात आल्या होत्या. ज्यावेळी हे केमिकल वेपन ड्यूमा शहरावर टाकण्यात आले तेव्हा या शहरात काही बंडखोर लोक लपून बेसले होते.

हे ही वाचा : ...इथं बनतो आपला लाडका तिरंगा

हे केमिकल बॉम्ब शहरात पडल्यानंतर स्थानिकांना त्याचा मोठा त्रास होऊ लागला होता. ज्यामुळं लोकांना श्वास घ्यायला त्रास होत होता, तोंडातून फेस यायला लागला तसेच इतरही अनेक लक्षण त्यांच्यामध्ये दिसून येत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.